Maharashtra Election 2019 ; राजघराण्यात काकाची पुतण्यावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:32+5:30
वास्तविक या मतदार संघात काँग्रेसने ऐनवेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर मैदानात उतरविल्याने आघाडीत बिघाडी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळेल, असा कयास लावला जात होता. त्यातल्या त्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा अहेरीत झाल्यामुळे भाजपचा विजय निश्चित होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरील नागरिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अहेरी मतदार संघातील तिहेरी लढतीत माजी राज्यमंत्री धर्मरावबाबाच बाजीगर ठरले. त्यांनी माजी राज्यमंत्री असलेले राजघराण्याचे वारसदार आणि आपले पुतणे अम्ब्रिशराव यांचा १५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभवत करत मोठी आघाडी घेतली.
वास्तविक या मतदार संघात काँग्रेसने ऐनवेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर मैदानात उतरविल्याने आघाडीत बिघाडी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळेल, असा कयास लावला जात होता. त्यातल्या त्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा अहेरीत झाल्यामुळे भाजपचा विजय निश्चित होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सर्व शक्यतांना बाजुला सारत धर्मरावबाबांनी बाजी मारून आपले वर्चस्व सिद्ध केले.
्या मतदार संघात आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून दीपक आत्राम यांनी बºयापैकी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद क्षेत्रावर वर्चस्व मिळविले आहे. त्याचा फायदा त्यांना होईल, असे मानले जात होते. त्यात काँग्रेसचे पाठबळ मिळाल्यामुळे त्यांची ताकद वाढली. परंतू काँग्रेसकडून त्यांच्या प्रचारासाठी कोणीही मोठा नेता आला नाही. धर्मरावबाबांनी सर्व मतदार संघ पिंजून काढत नागरिकांना साद घातली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बाबांना विजयापासून हुलकावणी मिळत गेली. त्यामुळे यावेळी त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूती होती. बाबांनीही त्यात कोणतीही कसर सोडली नाही.