महाशिवरात्री यात्रेचा आज प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:29 PM2019-03-03T21:29:16+5:302019-03-03T21:29:47+5:30
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होत आहे. यानिमित्ताने जिल्हाभर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने मंदिरांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ठिकठिकाणी धार्मिक सप्ताहासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होत आहे. यानिमित्ताने जिल्हाभर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने मंदिरांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ठिकठिकाणी धार्मिक सप्ताहासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
देसाईगंज - तालुक्यातील डोंगरमेंढा हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरात यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी उसळणार आहे. देसाईगंज तालुक्यातील महादेवाचे एकमेव निसर्गरम्य स्थळी वसलेले मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. डोंगरमेंढा गाव शंकरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येते. महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे यात्रेसाठी यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता भगवान शंकराच्या मूर्तीचे अनावरण आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी पहाटे ५ वाजता घटस्थापना, महापूजा होईल. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, सरपंच साधना बुल्ले, उपसरपंच मोरेश्वर डोंगरवार, माजी न्यायमूर्ती ज्ञानदेव परशुरामकर, जागेश्वर ठाकरे, पोलीस पाटील श्रीराम राऊत उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता गोपालकाला फोडण्यात येईल. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वितरण होईल. डोंगरमेंढा पहाडीवर मागील ३० वर्षांपासून यात्रा भरविली जात आहे. निसर्गाच्या सानिध्यात मंदिर असल्याने येथे येण्यासाठी भाविक आसुसलेले असतात. डोंगरमेंढा ते पहाडीपर्यंत मुख्यमंत्री सडक ग्रामसडक योजनेतून एक किमी अंतर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण यंदा करण्यात आले. त्यामुळे भाविकांना आवागमनासाठी सोयीचे झाले आहे. यंदा ५ मार्चला भाविकांच्या मनोरंजनासाठी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले जाणार आहे.
आष्टी - गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टीपासून १२ किमी अंतरावर चपराळा येथे हनुमान मंदिर प्रशांतधाम आहे. हे पवित्र तीर्थस्थळ वैनगंगा-वर्धा नदीच्या संगमालगत आहे. पुढे ही नदी प्राणहिता नावाने ओळखली जाते. हे स्थळ निसर्गरम्य व प्रेक्षणीय आहे. चपराळा येथील भगवान हनुमानाची पुरातनकालीन स्वयंभू जागृत मूर्ती ५०० वर्षांपूर्वीची आहे. मागील ६५ वर्षांपासून येथे येथे महाशिवरात्री यात्रा भरत आहे.
घनदाट जंगलामध्ये व्यापलेल्या या परिसरात १९४३ ते १९४४ मध्ये केंद्र सरकारच्या भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून प्रथमच सर्वेक्षण सुरू असताना कक्ष क्रमांक २४२ मध्ये हनुमानजीची मूर्ती आढळली. सदर मूर्ती तेथेच ठेवण्यात आली. तेव्हापासून येथे भाविक दर्शनासाठी येतात. प्रशांतधाम चपराळा देवस्थान विश्वस्त मंडळाचे संस्थापक व आजीवन अध्यक्ष श्री कार्तिकस्वामी महाराज १९५२ पासून कायम वास्तव्यास होते. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. १९७३ मध्ये येथे मंदिरालगत सभामंडप, भांडारकक्ष, धर्मशाळा इमारतीच्या कामाला मंजुरी मिळून बांधकाम पूर्ण करण्यात आले. चपराळा येथे १९५२ पासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत आहे. १९९० पासून यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्राचे लाखो भाविक दर्शन घेतात. २०१२ मध्ये कार्तिकस्वामी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर ज्या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात कार्तिक स्वामी महाराज बसत होते. त्याच ठिकाणी त्यांना समाधी देण्यात आली. या समाधी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या समाधी स्थळावरच कार्तिकस्वामी महाराजांची खूर्चीवरील मूर्ती बसविण्यात आली आहे. समाधी व मूर्ती स्थळावर संगमवरी दगडाचे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे छत उंच करून त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी मोठी जागा तयार करण्यात आली आहे. पुरातनकालीन हनुमान मंदिर उंचावरील मध्यभागी तयार करण्यात आले आहे. मंदिरात मार्बल व स्टाईल्स बसविण्यात आली आहे. हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला प्रभू रामचंद्रांची व भगवान शंकराची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. उजव्या बाजूला महादेवाचे पिंड आहे. संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या राहण्याच्या व झोपण्याच्या खोलीत पीओपी व टाईलस लावून सुशोभीत करण्याचे काम करण्यात आले आहे. तरी सुद्धा देवस्थानच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी व बांधकामाला असंख्य दानदाते सढळ हाताने मदत करीत आहेत. मंदिरात वर्षभरात रामनवमी, हनुमान जयंती, कार्तिक मास उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम होतात.
७ मार्चला चपराळात महाप्रसाद वितरण
चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त गुरूवार ७ मार्चला सकाळी अभ्यंग स्नान, सकाळी ९ वाजता कीर्तन व भजन, दुपारी १२ वाजता गोपालकाला व महाप्रसाद वितरण होईल. मुंबई येथील कल्पना नायर यांच्या मार्फत महाप्रसाद वितरण होणार आहे. या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
टिकेपल्ली येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव
मुलचेरा तालुक्यातील चुटुगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टिकेपल्ली येथे प्राणहिता नदीघाटावर असलेल्या शिवशंकर मंदिर परिसरात ३ ते ७ मार्चदरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवाला भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महोत्सवाचे अध्यक्ष सरपंच सुधाकर नैताम यांच्या नेतृत्वात तयारी पूर्ण झाली आहे. मागील २८ वर्षांपासून येथे यात्रा भरविली जात आहे. रविवारी सायंकाळी घटस्थापना करण्यात आली. ४ व ५ मार्चला नृत्य कार्यक्रम, ६ मार्चला देसाईगंज गु्रपतर्फे लावणी होईल. ७ ला समारोप होईल. या कार्यक्रमाला लाभ घ्यावा, असे आवाहन सुधाकर नैताम, भीमरामव कोरेत, तुळशिराम मडावी, गिरमा मडावी यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील त्रिवेणी संगमावरील सोमनूर
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीपासून दहा किमी अंतरावर सोमनूर हा त्रिवेणी संगम आहे. गोदावरी, इंद्रावती व पर्लकोटा या तीन नद्या येथे एकत्र येतात. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या या तीर्थक्षेत्राचे महत्व दंडकारण्य ब्रम्हपुराणातही सांगण्यात आले आहे. देवगुरू बृहस्पतीने महादेवाची स्थापना केली. सिध्देश्वराच्या नावाने ते प्रसिध्द झाले असा पौराणिक इतिहास सांगितला जातो. महाशिवरात्री निमित्त येथे शिवलिंगाची पूजा केली जाते.
जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील महादेवगड डोंगरी देवस्थान, जोगीसाखराजवळ गाढवी नदी तिरावरील शिवमंदिर, कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा, अरततोंडी, मुलचेरा तालुक्यातील टिकेपल्ली आदी ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्य यात्रा भरते. यावर्षी देखील येथे भाविकांची गर्दी उसळणार आहे.
अहेरी तालुक्यातील पहाडावरील लक्कामेंढा
रेपनपल्लीपासून ५ किमी अंतरावर असलेल्या लक्कामेंढा पहाडावर महाशिवरात्रीला दरवर्षी यात्रा भरते. पांडवकालीन लाक्षागृह येथे असल्याने त्यावरुन या ठिकाणाला लक्कामेंढा हे नाव पडले. येथे तीन ते चार किमी अंतर पायी चढुन पहाडावर जावे लागते. उंच पहाडावर भुयारी मार्ग, गुफा, तलाव असून पहाडावरील तलावात बारमाही पाणी राहते. ‘लक्का’ म्हणजे लाख व ‘मेंढा’ म्हणजे महाल किंवा निवास असा लक्कामेंढा या ठिकाणाचा आशय आहे. याशिवाय याठिकाणी एक गुहा असून याला बोलीभाषेत ‘राक्षसी दोना’ असे म्हणतात. या ठिकाणी मोठमोठे दगड असून डोंगरावर चढायला अरुंद पायवाट आहे. वरच्या बाजूला डोंगर तर खालच्या बाजूला दरी आहे. संकटाच्यावेळी लोक श्रद्धेने या ठिकाणी जाऊन पूजापाठ करतात. दरवर्षी यात्रेसाठी येथे हजारो भाविक येतात.
धानोरा तालुक्यातील भवरागडावरचे शिवमंदिर
धानोरापासून ३ किमी अंतरावर पश्चिमेला भवरागड देवस्थान आहे. येथे दरवर्षी होळी सणाच्या आधी म्हणजे पहिल्या गुरूवारी कठाणी नदीच्या पात्रात यात्रा भरते ही यात्रा मागील ६० वर्षांपासून भरत आहे. या यात्रेला दरवर्षी १० ते १५ हजार भाविक भेट देतात. नदीच्या काठी असलेल्या पहाडावर ३०० मीटर उंचीवर शिव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. मंदिर ३०० वर्षापूर्वीचे असल्याचे देवस्थानातील एका ग्रंथात नोंदही आहे. या ठिकाणी जगत् गुरूची गुफा व भुयार आहे. येथे प्रतिध्वनीसुध्दा ऐकण्यास मिळतो. पुरातन काळापासून सुरू असलेल्या भवरागड यात्रेची पूजा महाशिवरात्रीनंतर दौलतशहा महाराज मडावी यांच्या वाड्यातून आरती नेऊन पुजाºयाच्या हस्ते केली जाते. महाशिवरात्री निमित्त येथे भाविकांची यंदाही गर्दी होणार आहे.
विदर्भातील सप्तधामांपैकी वैरागडचे भंडारेश्वर मंदिर
वैरागड - वैरागड गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही नद्यांच्या संगमावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर विदर्भातील सप्तधामांपैकी एक असून महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. बाराव्या शतकातील ताम्रपट शीलालेखात वैरागड गावाचा उल्लेख आढळतो. हिऱ्याला संस्कृतमध्ये वज्रागर म्हणतात. पूर्वी येथे हिऱ्याची खाण होती. त्यामुळे या शब्दाचा अपभ्रंश होऊन वज्रागरचे वैरागड झाले, असा इतिहास सांगितला जातो. येथील हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन चंद्रपूरचा गौड राजा बल्हाळशाहाने वैरागड येथे किल्ला बांधला. त्याचदरम्यान राजा बल्हाळशाहा राजाच्या मोठ्या भावाची पत्नी हिराईदेवीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ वैरागड येथे एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे मंदिर बांधले. हे मंदिर रेखीव व तत्कालीन वास्तूकलेचा उत्तम नमूना आहे. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे वैरागड किल्ल्याचे तट, बुरूजाची पडझड झाली आहे. हा किल्ला झाडाझुडूपांना व्यापाला आहे. येथील भंडारेश्वर देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सतत पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून भंडारेश्वर