गडचिरोली जिल्ह्यात कृउबासत महाविकास आघाडीचा धुव्वा
By दिगांबर जवादे | Published: April 29, 2023 04:19 PM2023-04-29T16:19:14+5:302023-04-29T16:19:37+5:30
Gadchiroli News गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी व अहेरी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात गडचिराेली व आरमाेरीत भाजप, चामोर्शीत अतूल गण्यारवार गट व अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघाने बहुमत प्राप्त केले आहे.
दिगांबर जवादे
गडचिराेली : गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी व अहेरी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात गडचिराेली व आरमाेरीत भाजप, चामोर्शीत अतुल गण्यारवार गट व अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघाने बहुमत प्राप्त केले आहे.
गडचिराेली व आरमाेरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अरविंद पाेरेड्डीवार, प्रकाश पाेरेड्डीवार, आ. डाॅ. देवराव हाेळी व शिवसेनच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. सर्वच संचालक आपलेच निवडून येतील यासाठी माेर्चेबांधणी केली. ही माेर्चेबांधणी यशस्वीसुद्धा झाली. आरमाेरी व गडचिराेली कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे सर्वच अठराही उमेदवार निवडून आले. चामाेर्शी कृउबासत १२ संचालक अतुल गण्यारवार गटाचे निवडून आले आहेत. अहेरी कृउबासत आदिवासी विद्यार्थी संघाचे ११ संचालक निवडून आले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीनेही उमेदवार उभे केले हाेते. मात्र एकाही कृउबासत बहुमत मिळाले नाही.