२ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:38+5:302021-06-26T04:25:38+5:30

गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना ...

Mahayagya of blood donation in the district from 2nd July | २ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ

२ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ

googlenewsNext

गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोणत्यातरी निमित्ताने स्वत: रुग्णालयात जाऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गरजवंतांना रक्त मिळणे कठीण होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकमतच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या उपक्रम जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविला जाणार आहे.

आरमोरी येथील शिबिरासाठी जय दुर्गा मंडळाचे मनोहर मोटवानी, सुदाम मोटवानी यांनीही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(बॉक्स)

चार शिबिरे निश्चित, अजूनही वाढणार

१) २ जुलै - पोलीस हॉस्पिटल, गडचिरोली

२) ५ जुलै - साई नर्सिंग स्कूल, आरमोरी

३) ६ जुलै - ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी

४) ११ जुलै - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली

याशिवाय इतर ठिकाणी शिबिरांचे नियोजन सुरू असून, यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांनी लोकमत कार्यालयाकडे संपर्क करावा.

(बॉक्स)

सुवर्ण महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकी

लोकमतच्या वाटचालीला ५० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत लोकमतने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७४९९९०४७६४ या क्रमांकावर फोन करून आपल्या नावाची नोंदणी करावी.

कोट

- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्याची सर इतर कुठल्याही दानाला येणार नाही. कारण त्यातून आपण एखाद्याचा जीव वाचवत असतो. विविध आजारांच्या रुग्णांसह गरोदर महिला, सिकलसेल रुग्णांना रक्ताची गरज असते. रक्तदान केल्याने आपले काही नुकसान होत नाही, पण समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवल्याचे समाधान निश्चितपणे मिळेल. त्यामुळे ‘लोकमत’च्या या महायज्ञात सर्वांना सक्रिय सहभाग घ्यावा.

- अंकित गोयल,

जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Mahayagya of blood donation in the district from 2nd July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.