४२ ग्रामपंचायतींवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:18+5:302021-03-10T04:36:18+5:30
बदलत्या काळानुसार महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे पूर्वी ‘चूल आणि मूल’ या क्षेत्रापुरती मर्यादित असणारी महिलांची ...
बदलत्या काळानुसार महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे पूर्वी ‘चूल आणि मूल’ या क्षेत्रापुरती मर्यादित असणारी महिलांची चौकट पार पाडून ती आकाशाला गवसणी घालण्यापासून अनेक कार्य क्षेत्रांत महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिला नाही प्रत्येक क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी तालुक्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त महिला सरपंच झालेल्या आहेत. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी' या वचनाप्रमाणे ४२ ग्रामपंचायतींच्या कारभाराची दोरी महिलांच्या हातात आली आहे. तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच महिलांमध्ये आष्टी-सरपंच बेबी बंडूजी बुरांडे, विसापूर रै .- सरपंच गौराबाई भगवंतराव गाडवे, कुनघाडा रै .-सरपंच अलका नामदेव धोडरे , भेंडाळा - सरपंच कुंदा नरेंद्र जुवारे , दोटकुली -सरपंच जया अभिजित सातपुते ,नवेगाव (माल) - सुप्रिया सुधीर धुडसे, मुरखळा चक - सरपंच शेवंताबाई भय्याजी गेडाम , वेलतुर तुकुम - सरपंच संध्या संतोष नायबनकर , वाघोली - सरपंच सोनी प्रमोद किरमे , कान्होली - वंदना रमेश नागापुरे , कळमगाव - सरपंच उषा राजेंद्र सयाम ,वसंतपुर - शासती राकेश सरकार ,फोकुर्डी -सरपंच चेतनमाला सुदर्शन रोहनकर ,फराडा - सरपंच अनिता गुरुदास जिलेपल्लीवार ,येडानूर - सरपंच रजनीताई पांडुरंग उसेंडी ,गिलगाव ( जमी ) -रेखा रामगोपाल अलाम ,विकासपल्ली -प्रभाती सोमनाथ बैदय ,रेगडी - सरपंच मोहिना डोलेश लेकामी ,भाडबिडी ( बी .) - सरपंच पार्वती राजेंद्र गावडे ,हळदवाही - सरपंच नीता संजय पुडो ,चाकलपेठ - सरपंच गीता विकास रायशीडाम ,वायगाव - सरपंच मालताताई उत्तमप्रकाश मेश्राम , अड्याळ - सरपंच बेबीताई बाबूराव बकाले ,मुधोली तुकुम - सरपंच शकुंतला रवींद्र डाकोटे ,जैरामपूर - सरपंच दीपाली सुधीर सोयाम , सोनापूर - सरपंच गोपिका गुरुदास टेकाम ,आमगाव ( महाल ) - सरपंच ज्योत्स्ना गजानन गव्हांरे ,मार्कडा ( कंसोबा ) - सरपंच वनश्री विवेक चाफले ,कुनघाडा माल - सरपंच माया रमेश कन्नाके ,चंदनखेडी - सरपंच इंदिरा बंडू बोरकुटे ,मुधोली चक -अश्विनी रोशन कुमरे ,हळदी माल -अंजुबाई शिवाजी मोटघरे ,अनखोडा - सरपंच रेखा मिलिंद येलमुले ,वाकडी - सरपंच भाग्यश्री अमोल मंगर ,चापलवाडा - सरपंच रेखा गीतेश कोहपरे ,मक्केपली चक- १ - सरपंच संगीता रुपेश वैरागडे ,सिमुलतला पुनिमी तारक हालदार ,सगणापूर - सरपंच पर्वता भाऊजी कन्नाके ,मुरमुरी -गीता भाऊराव सेडमाके ,पेटतळा -शोभा रमेश कन्नाके ,पावीमुरांडा - सरपंच माधुरी रामदास आतला ,लखमापूर बोरी - सरपंच किरण विश्वनाथ सुरजागडे या ४२ महिलांच्या हाती गावकारभाराची जबाबदारी दिली आहे.