पुरोगामी महाराष्टÑाची प्रतिमा कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:36 AM2018-05-03T00:36:25+5:302018-05-03T00:36:25+5:30

राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.

Maintain the image of progressive Maharashtra | पुरोगामी महाराष्टÑाची प्रतिमा कायम ठेवा

पुरोगामी महाराष्टÑाची प्रतिमा कायम ठेवा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात, पोलीस दलाच्या जवानांचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा आज येथे पोलिस कवायत मैदानावर झाला. या प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
आज देशापुढे अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने विघटनवादी शक्तीचा उल्लेख करावा लागेल. तसेच देशांतर्गत आपल्या राज्यासह इतर शेजारी राज्यातसुध्दा नक्षल चळवळी मूळे अशांतता निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्याची जबाबदारी ही शासनाची असून ही जबाबदारी समर्थपणे पेलल्या जात आहे. हे करीत असतांना अनेक जवानानी आपले बलिदान दिलेले आहे. त्या जवानांचे या दिवशी स्मरण करुन त्यांना अभिवादन करतो. या चळवळीचा बिमोड करण्यात पोलीस दलाच्या जवानांनी नुकतेच जे शौर्य दाखवले त्या जवानांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. अशा शक्तीचा विमोड करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या केले. यावेळी एसडीपीओ डॉ. कवडे यांच्या नेतृत्वात पोलीस जवान व होमगार्डच्या पथकांनी संचलन केले. सोबतच बॉम्बशोधक पथकानीही यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन क्रिडा अधिकारी मदन टापरे तर आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी मानले.

Web Title: Maintain the image of progressive Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.