वैज्ञानिक दृष्टिकोन कायम जोपासा

By admin | Published: November 12, 2016 02:17 AM2016-11-12T02:17:46+5:302016-11-12T02:17:46+5:30

सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे.

Maintain a scientific approach | वैज्ञानिक दृष्टिकोन कायम जोपासा

वैज्ञानिक दृष्टिकोन कायम जोपासा

Next

विजय मुळीक यांचे प्रतिपादन : इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन
गडचिरोली : सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. मात्र अद्यापही अनेक लोक अंधश्रध्देच्या आहारी जातात. शाश्वत विकासासाठी कायम वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासून प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी केले.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार नवी दिल्ली तर्फे इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शुक्रवारी कारमेल हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, उपशिक्षणाधिकारी चावरे, प्राचार्य संजय नार्लावार, कारमेल हायस्कूलचे प्राचार्य जॉय, विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

१०४ प्रतिकृती दाखल
विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हाभरातून १५३ विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत १५३ पैकी १०४ प्रतिकृतीची नोंदणी करून सदर प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केले. अहेरी तालुक्यातून ६, आरमोरी ८, चामोर्शी २७, देसाईगंज ५, धानोरा १४, एटापल्ली ४, गडचिरोली २४, कोरची ५, कुरखेडा ५ व मुलचेरा तालुक्यातून एकूण पाच प्रतिकृती शुक्रवारी सायंकाळपर्यंत सादर करण्यात आले होते.

Web Title: Maintain a scientific approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.