धान खरेदीत आविका संस्थांनी पारदर्शकता ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:37 PM2017-12-03T22:37:17+5:302017-12-03T22:37:27+5:30

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रूपयाच्या धानाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदी प्रक्रियेत संस्थांकडून प्रसंगी चुकाही होत असतात. संस्थांनी चुका टाळल्या पाहिजेत.

Maintain transparency in arrivals by purchasing paddy | धान खरेदीत आविका संस्थांनी पारदर्शकता ठेवावी

धान खरेदीत आविका संस्थांनी पारदर्शकता ठेवावी

googlenewsNext
ठळक मुद्देदिनकर जगदाळे यांची सूचना : गडचिरोलीत आॅनलाईन धान खरेदी व प्रतवारीबाबत प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रूपयाच्या धानाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदी प्रक्रियेत संस्थांकडून प्रसंगी चुकाही होत असतात. संस्थांनी चुका टाळल्या पाहिजेत. यंदाच्या खरीप हंगामात संस्थांनी धानाची आर्द्रता (मॉईश्चर) तपासावी. भरडाईस पात्र (एफएक्यू) अशाच धानाची केंद्रांवर खरेदी करावी. साठवणुकीची व्यवस्थेची काळजी घेऊन तसेच आॅनलाईन माहिती भरून संस्थांनी धान खरेदी प्रक्रियेत १०० टक्के पारदर्शकता ठेवावी, अशी सूचना आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे यांनी केली.
महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी स्थानिक गोंडवाना कला दालनात सन २०१७-१८ मधील आॅनलाईन धान खरेदी व धानाच्या प्रतवारीबाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, आदिवासी महामंडळाचे संचालक, बी. टी. जुगनाद, पी. टी. दडमल, भारतीय अन्न महामंडळाचे गुणवत्ता नियंत्रणक चिमुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी चांदूरकर, सहायक निबंध पाटील, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अवताडे, महाव्यवस्थापक (गोंडवन) रणमाळे, लेखा व्यवस्थापक शर्मा, गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार, आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी राहूल पाटील, पंकज चलाख आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेत गुणवत्ता नियंत्रण अधिकारी चिमुरकर यांनी धानाची प्रतवारी व साठवणुकीविषयी मार्गदर्शन केले. पंकज चलाख यांनी शेतकºयांचे आॅनलाईन पेमेंट करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आविका संस्थाच्या अडचणीबाबत विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाचे उपव्यवस्थापक जी. एम. सावळे यांनी केले तर आभार लेखापाल एम. आर. वानखेडे यांनी मानले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आविका संस्थांचे २०० पदाधिकारी हजर होते.
उल्लेखनीय कार्यासाठी तीन संस्थांचा गौरव
महामंडळांतर्गत असलेल्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, चंद्रपूर कार्यालयातील सावरगाव, अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सिरोंचा तालुक्यातील अंकिसा या तीन संस्थांनी सन २०१६-१७ च्या खरीप व रबी हंगामात उत्कृष्ट साठवणूक करून मोठ्या प्रमाणात धान खरेदी योग्यरित्या पार पाडली. त्यामुळे या तीन संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. या संस्थांचा आदर्श घेऊन अन्य संस्थांनी धान खरेदीचे काम यंदाच्या हंगामात करावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Maintain transparency in arrivals by purchasing paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.