मका खरेदी दोन दिवसांत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:24+5:302021-06-09T04:45:24+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे उपोषण ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे उपोषण केले असल्याचे डॉ. होळी यांची उपोषणप्रसंगी सांगितले. यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे, रमेश भुरसे, योगिता भांडेकर, गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, देसाईगंज नगर परिषदेचे सभापती मोतीलाल कुकरेजा, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पं.स. सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास देशमुखे, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे आदी अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान खरेदी प्रक्रियेत आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी व निवेदने आमदार होळी यांना दिली. त्यावर तातडीने कारवाई करीत आमदारांनी सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. उपस्थित शेतकरी आंदोलकांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.