रेशनकार्डधारकांच्या माथी मका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:20+5:302020-12-28T04:19:20+5:30
गडचिराेली जिल्ह्यात रेशनकार्डधारकांची संख्या माेठी आहे. अंत्याेदय, अन्न सुरक्षा (पिवळे कार्ड), अन्न सुरक्षा (केशरी कार्ड), एपीएल व पांढरा शुभ्र ...
गडचिराेली जिल्ह्यात रेशनकार्डधारकांची संख्या माेठी आहे. अंत्याेदय, अन्न सुरक्षा (पिवळे कार्ड), अन्न सुरक्षा (केशरी कार्ड), एपीएल व पांढरा शुभ्र कार्ड आदी पाच राशन कार्डाचे प्रकार आहे. या पाच पैकी एपीएल व पांढऱ्या कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून कुठल्याही प्रकारचे धान्य मिळत नाही.
अंत्याेदय याेजनेत असलेल्या रेशनकार्डधारकांना प्रती कार्ड ३५ किलाे धान्य वितरित केले जाते. यामध्ये पूर्वी १० किलाे गहू व २५ किलाे तांदूळ दिले जात हाेते. मात्र मक्याचा पुरवठा सुरू झाल्यापासून पाच किलाे गहू, पाच किलाे मका व २५ किलाे तांदूळ दिले जात आहे. अन्न सुरक्षा याेजनेतील रेशनकार्डधारकांना प्रती व्यक्ती ३ किलाे तांदूळ व दाेन किलाे गहू दिले जात हाेते. मात्र मक्याच्या पुरवठा सुरू झाल्यापासून गव्हाचे परिमाण कमी करण्यात आले आहे. तांदळाचे परिमाण कायम ठेवण्यात आले असून दाेन किलाे गव्हाऐवजी प्रती व्यक्ती एक किलाे मका व एक किलाे दिले जात आहे. स्वस्त धान्य दुकानातून मका देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील एकाही रेशनकार्डधारकांनी केली नाही. तरी सुध्दा जबरदस्तीने रेशनकार्डधारकांना प्रती किलाे १ रुपयाप्रमाणे मका दिला जात आहे. नाेव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बऱ्याच रेशनकार्डधारकांना मका सुध्दा मिळाला नाही, अशा तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात मिळणारा मका महिना संपूनही स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाला नाही. संबंधित दुकानदारांनी मक्याचे पैसे प्रशासनाकडे भरले असल्याची माहिती आहे. मात्र दुकानदारांनी जेवढा मका देय आहे, तेवढ्या प्रमाणात गहू देत नसल्याचे रेशनकार्डधारकांचे म्हणणे आहे. मक्याचा पुरवठा झाला नसताना सुध्दा गव्हाचे परिमाण कमी केल्याने रेशनकार्डधारकांमध्ये प्रशासनाच्या या धाेरणाप्रती प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
काेट
मक्यापासून विविध पदार्थ तयार हाेत असले तरी हे पदार्थ तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांकडे तेवढा वेळ नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा मका तसाच पडून राहत आहे. शासन व प्रशासनाने रेशनकार्डधारकांच्या परिस्थितीचा विचार करून मक्याऐवजी गहू व पूर्वीप्रमाणे तांदूळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.
- शेवंताबाई नामदेव सिडाम, रा. विहिरगाव
बाॅक्स
बाजारात हाेताहे मक्याची विक्री
स्वस्त धान्य दुकानातून प्रती किलाे १ रुपयाप्रमाणे मका मिळत असला तरी या मक्याचा वापर बहुतांश रेशनकार्डधारक खाण्यासाठी करत नसल्याचे दिसून येत आहे. आरमाेरी व गडचिराेली तालुक्यासह शहरी भागातील बाजारपेठेत स्वस्त धान्य दुकानातील हा मका रेशनकार्डधारक १० रुपये किलाे प्रमाणे विकत असल्याचे दिसून येते. जनावरांचे खाद्य म्हणून या मक्याचा वापर केला जात आहे.