सर्व विभागांची कामे जलदगतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:36+5:30

आशित पिपरे यांनी ओबीसी जनगणना, आयुष्यमान भारत योजना, अपघातग्रस्त रूग्णांसाठी चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र दक्षता विभाग निर्माण करणे आदी मागण्या केल्या. पूर्वसूचना न देताना चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थांना विनाविलंब शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्या पिपरे यांनी यावेळी केल्या.

Make all department work faster | सर्व विभागांची कामे जलदगतीने करा

सर्व विभागांची कामे जलदगतीने करा

Next
ठळक मुद्देआमदारांचे निर्देश : आमसभेला अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेली सर्व विभागांची कामे गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता जलदगतीने करावी, तसेच सर्व योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना विनाविलंब मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
चामोर्शी पंचायत समितीची आमसभा गुरूवारी पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जि.प. कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प. समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप, पं.स. सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदना गौरकार, जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार, शिल्पा रॉय, विद्या आभारे, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, पं.स.चे माजी सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, शिवसेना शहर प्रमुख अमित यासलवार आदी यावेळी उपस्थित होते. जि.प. सदस्य पंदिलवार यांनी आष्टी क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या. आष्टी क्षेत्राअंतर्गत रस्ते खड्डेमय बनले आहे. ग्रामीण रूगणालयात पाण्याची व्यवस्था नाही, विद्युत समस्या, बसस्टॅन्डसाठी जागा नसल्यामुळे रखडलेले बांधकाम अशा अनेक समस्या पंदिलवार यांनी मांडल्या. प्रास्ताविक बीडीओ एस. एल. बोरावार, संचालन पंचायत विस्तार अधिकारी पेंदोर, पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी केले.

तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश
आशित पिपरे यांनी ओबीसी जनगणना, आयुष्यमान भारत योजना, अपघातग्रस्त रूग्णांसाठी चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र दक्षता विभाग निर्माण करणे आदी मागण्या केल्या. पूर्वसूचना न देताना चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थांना विनाविलंब शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्या पिपरे यांनी यावेळी केल्या. कोर्ट स्टॅम्प, स्टॅम्प पेपर, किसान क्रेडीट कार्ड याविषयी दिरंगाई होत असल्याने या सभेत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. माजी पं.स. उपसभापती यशवंत लाड, गंगाधर गण्यारपवार, दीपक हलदर यांनीही अनेक तक्रारी केल्या. त्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश आमदारांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.

नियमित बिडीओ नसल्याने ओरड
चामोर्शी पंचायत समितीच्या नियमित गट विकास अधिकाऱ्यांची बदली होऊन एक वर्ष नऊ महिने उलटले. मात्र सदर पंचायत समितीला नियमित व स्थायी बीडीओंची नियुक्ती करण्यात आली नाही. पावणे दोन वर्ष उलटूनही या पंचायत समितीचा कारभार प्रभारी गट विकास अधिकाऱ्यावर सुरू आहे. सहायक गट विकास अधिकारी नितेश माने यांच्याकडे गेल्या दीड वर्षापासून बीडीओ प्रभार आहे. मात्र आज झालेल्या आमसभेला ते मागील सभेप्रमाणे गैरहजर होते. बीडीओचे पद रिक्त असल्याच्या मुद्यावर नागरिकांनी या आमसभेत ओरड केली. आमसभा तब्बल अडीच तास उशीरा सुरू झाली. येथे स्थायी संवर्ग विकास अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली.

Web Title: Make all department work faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.