आखीव पत्रिका उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:36 AM2021-03-19T04:36:09+5:302021-03-19T04:36:09+5:30
गडचिराेली : शहरातील ढिवर माेहल्ला, तेली माेहल्ला व अन्य वाॅर्डांतील नागरिक अनेक वर्षांपासून जेथे वास्तव्य करीत आहेत. जवळपास तीन ...
गडचिराेली : शहरातील ढिवर माेहल्ला, तेली माेहल्ला व अन्य वाॅर्डांतील नागरिक अनेक वर्षांपासून जेथे वास्तव्य करीत आहेत. जवळपास तीन पिढ्यांपासून लाेक येथे वास्तव्य करीत आहेत. या नागरिकांना आखीव पत्रिका उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रामकिरीत यादव व माजी नगराध्यक्ष डाॅ. अश्विनी यादव यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ढिवर माेहल्ला व तेली माेहल्ल्यात तीन ते चार पिढ्यांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या अज्ञानामुळे किंवा अशिक्षितपणामुळे त्यांनी घराच्या आखीव पत्रिकेवर नाव बदलवले नाही. काही लाेकांची घरे आजाेबा व पणजाेबांच्या नावाने आहेत. परंतु, पुरावा व कागदपत्रांच्या अभावामुळे ते काम करू शकत नाहीत. नवीन याेजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचे नाव आखीव पत्रिकेवर असणे आवश्यक आहे. नगर परिषद क्षेत्रातील घरकूल याेजनेचा लाभ याशिवाय घेता येत नाही. त्यामुळे अनेक जण वंचित राहण्याची शक्यता आहे. भूमिअभिलेख कार्यालयात याबाबत चाैकशी केली असता, आखीव पत्रिकेवर अनेकांची नावे नसल्याचे समजले. त्यामुळे याेजनांचा लाभ घेण्यासाठी जुन्या वस्तीतील लाेकांना आखीव पत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रामकिरीत यादव व डाॅ. अश्विनी यादव यांनी ना. बाळासाहेब थाेरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर ताेडगा काढण्याचे आश्वासन ना. थाेरात यांनी यादव दाम्पत्याला दिले.