वनहक्काचे दस्तऐवज उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:46 AM2018-02-21T01:46:52+5:302018-02-21T01:47:32+5:30
सामुहिक वनहक्काचा दावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले बंदोबस्त मिसाल हक्क निस्तार पत्रक, गाव नकाशा, जंगल नकाशा, गाव नमुना-१-अ आदी दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, ......
ऑनलाईन लोकमत
अहेरी : सामुहिक वनहक्काचा दावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले बंदोबस्त मिसाल हक्क निस्तार पत्रक, गाव नकाशा, जंगल नकाशा, गाव नमुना-१-अ आदी दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पेरमिली इलाका पारंपरिक पट्टी येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीमध्ये येणाऱ्या मेडपल्ली, पेरमिली, येरमनार, आरेंदा, पल्ले, कुरूमपल्ली, मांड्रा, दामरंचा, राजाराम, खांदला, कमलापूर, रेपनपल्ली, उमानूर, येडमपल्ली, जिमलगट्टा, पेठा, देचली, गोविंदगाव, मरपल्ली, एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही, पिनगुंडा, मगुंठा आदी गावातील नागरिक सामुहिक वनहक्कासाठी दावा करणार आहेत. यासाठी आवश्यक असलेली दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी बालाजी गावडे, सांबय्या करपेत, शंकर आत्राम, बाजीराव तलांडे, भगवान मडावी, झिलकर मडावी, महेश मडावी उपस्थित होते.