प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करा

By admin | Published: September 24, 2016 03:16 AM2016-09-24T03:16:34+5:302016-09-24T03:16:34+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रगत करण्याचे धोरण आहे. यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना

Make each student progress | प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करा

प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करा

Next

शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : भाकरोंडी येथे केंद्रस्तरीय परिषद
आरमोरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रगत करण्याचे धोरण आहे. यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मिळून काम करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे यांनी केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पिसेवडधा केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच शासकीय आश्रमशाळा भाकरोंडी येथे पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी साखरे बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, भामरागडचे उपक्रमशील साधन व्यक्ती चांगदेव सोरते, शिक्षण विस्तार अधिकारी डी. जे. नरोटे उपस्थित होते.
ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले यांनी विद्यार्थी प्रगत करताना येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करता येईल, याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले. चांगदेव सोरते यांनी मागास भागात राहूनही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आकडेवारी मांडली.
यावेळी पी. एस. आंबोरकर, अविनाश मुळे, श्यामराव राजपंगे, थलाश धाकडे यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आनंद गुरनुले, संचालन श्यामराव राजपंगे तर आभार जीवन शिवणकर यांनी मानले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ७२ शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख शंकर बोरकर, फटिंग, कैलास टेंभूर्णे, मुख्याध्यापिका भुरे, गंधे, भारसाकडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Make each student progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.