कायमसाठीचा लढा आणखी तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:25 AM2018-04-02T00:25:34+5:302018-04-02T00:25:34+5:30

कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासाठी लढा आणखी तीव्र केला जाईल. टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल अशी माहिती गडचिरोली जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर यांनी दिली आहे.

To make the fight for permanent glory intensify | कायमसाठीचा लढा आणखी तीव्र करणार

कायमसाठीचा लढा आणखी तीव्र करणार

Next
ठळक मुद्देकंत्राटी कर्मचारी संघटनेचा निर्धार : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासाठी लढा आणखी तीव्र केला जाईल. टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल अशी माहिती गडचिरोली जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर यांनी दिली आहे.
शासनाच्या अत्यावश्यक सेवेसह सर्वच विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात या कर्मचाºयांची संख्या तीन हजारांच्या जवळपास आहे. कंत्राटी कर्मचाºयांनी आंदोलन केल्यास संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडते. मात्र शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नेहमीच अन्याय करीत आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. ही मुख्य मागणी आहे. या मागणीबरोबरच शासन शाळा, दवाखाने यांचे खासगीकरण करीत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढत आहे. खासगीकरण बंद करावे. प्रशासनात रिक्त असलेल्या जागांवर सर्वप्रथम कंत्राटी कर्मचाºयांचे समायोजन करावे, त्यानंतर शिल्लक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवावी. समान काम, समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. ८ मार्चचे परिपत्रक रद्द करावे. विशेष शिक्षकांना १५ दिवसांच्या उपभोग रजा आहे. त्यांचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावा. ग्राम विद्युत सेवकांनाच विद्युत व्यवस्थापक म्हणून कायम ठेवावे. कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या प्रसुती रजा मंजूर कराव्या. अर्जित रजांचा लाभ द्यावा, विमा संरक्षण द्यावे आदी मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुख अन्यायकारक वागणूक देत आहेत. नांदेड व नागपूर येथून बदलून आलेल्या विषय साधन व्यक्तींना २२ जुलै २०१६ ते १८ आॅगस्ट २०१६ पर्यंतचे मानधन द्यावे, पेसा समन्वयकांच्या मानधनात दरवर्षी वाढ करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन उभारले जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर याने दिली. यावेळी कार्याध्यक्ष मनोहर वाकडे, प्रकाश लाडे, प्रशांत बांबोळे, राकेश बरडे, गोविंद पुलमवार, लवकुश उरकुडे, गणेश ठाकरे, गजानन परचाके, प्रभाकर नरोटे, पंकज खरवडे, ओमप्रकाश निकुरे, भुमेश्वरी वाढई, रेखा कोवासे उपस्थित होते.
आंदोलनाची रूपरेषा
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या घराला घेराव घातला जाईल. दुसºया आठवड्यात निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केले जाईल. तिसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, मे च्या पहिल्या आठवड्यात साखळी उपोषण केले जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास मे च्या दुसºया आठवड्यापासून आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.

Web Title: To make the fight for permanent glory intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.