महामार्गाच्या दुभाजकाची लांबी दोन किमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:23+5:302021-01-08T05:56:23+5:30
गडचिराेली : गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी या महामार्गावर चामाेर्शी शहरातून जाणाऱ्या रस्ता दुभाजकाची लांबी केवळ ८०० मीटर ...
गडचिराेली : गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी या महामार्गावर चामाेर्शी शहरातून जाणाऱ्या रस्ता दुभाजकाची लांबी केवळ ८०० मीटर इतकी मंजूर करण्यात आली आहे. ही लांबी अतिशय कमी आहे. दुभाजकाची लांबी वाढवून ती दोन किमी इतकी करावी, अशी मागणी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे जलदगतीने सुरू असून अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीवर आहे. चामाेर्शी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रस्ता दुभाजकाची लांबी केवळ ८० मीटर इतकी मंजूर करण्यात आली आहे. चामाेर्शी हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे माेठी नगर पंचायत आहे. या रस्त्याची शहरातून जाणारी लांबी किमान दाेन किमी असल्याने कमीत कमी दाेन किमी अंतरावर रस्ता दुभाजक हाेणे आवश्यक आहे. ही बाब आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, अजूनपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही, असे आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी निवेदनात म्हटले आहे.