शासकीय योजनेतून प्रगती साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:53 AM2017-10-07T00:53:41+5:302017-10-07T00:53:53+5:30
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना सन्मान देण्यासाठीही केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला (किन्हाळा) : केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना सन्मान देण्यासाठीही केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
कोंढाळा येथे स्वच्छता हीच सेवा उपक्रमाचा समारोप गॅस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, जि. प. सदस्य रोशनी पारधी, पं. स. उपसभापती गोपाल उईके, बीडीओ संगीता भांगरे, सहायक बीडीओ सुनीता मरस्कोल्हे, पंचायत विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील कुंभलवार, माजी सरपंच कैलास राणे, पंढरी नकाते, माजी उपसभापती नितीन राऊत, नागोराव उके, पं. स. सदस्य ढोरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरीभाऊ पत्रे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कोंढाळा येथील सात कुटुंबांना वन विभागाच्या योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामसेवक पी.एल. पेशने, संचालन पी.एस. धोटे तर आभार सुनील पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.