गृहरक्षक दलातील जवानांना कायम करा

By admin | Published: May 20, 2016 01:21 AM2016-05-20T01:21:01+5:302016-05-20T01:21:01+5:30

परीक्षा बंदोबस्त, मोेचे, सण, उत्सव या दरम्यान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या ...

Make the soldiers in the guild-house | गृहरक्षक दलातील जवानांना कायम करा

गृहरक्षक दलातील जवानांना कायम करा

Next

देसाईगंज : परीक्षा बंदोबस्त, मोेचे, सण, उत्सव या दरम्यान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना अत्यंत कमी दिवस काम उपलब्ध करून दिले जात आहे. या गृहरक्षक दलाच्या जवानांना कायम करण्यात यावे अशी मागणी गृहरक्षक जवानांकडून होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८२५ गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. त्यांची तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा समादेशक हे पद आहे. तर तालुकास्तरावर तालुका समादेश हे पद आहे. तालुका समादेशकाच्या माध्यमातुन जवळपासच्या पोलीस ठाण्यात गृहरक्ष जवानांना सेवेसाठी पाचारण करण्यात येते. एखाद्या ठिकाणी काम मिळाले व मध्येच बंदोबस्त आला तर या जवानांना ताबडतोब रूजू व्हावे लागते. त्यामुळे हाताला मिळालेले कामही निघून जाते. जवानांचा भत्ता १७५ रूपयांवरून ४०० रूपये करण्यात आला आहे. भत्यात वाढ झाली असली तरी रोजगाराचे दिवस कमी झाले आहे. इतर राज्यात गृहरक्षक दलाच्या जवानांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Make the soldiers in the guild-house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.