विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावा

By admin | Published: July 23, 2016 01:59 AM2016-07-23T01:59:44+5:302016-07-23T01:59:44+5:30

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याबाबतचे धडे शिक्षकांनी द्यावे,

Make the students clean habits | विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावा

विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावा

Next

रवींद्र रमतकर यांचे आवाहन : गुणवत्ता कक्ष व नावीण्यपूर्ण उपक्रम कक्षाची बैठक
गडचिरोली : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याबाबतचे धडे शिक्षकांनी द्यावे, तशा सवयी त्यांना पाडाव्या, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले.
डायट येथे गुरूवारी जिल्हा गुणवत्ता कक्ष व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्षाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी राऊत, आकेवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. धनंजय चापले, डॉ. विनीत मत्ते, डॉ. नरेश वैद्य यांच्यासह जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व गुणवत्ता कक्षाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते. सभेदरम्यान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार माहे जून २०१६ चा प्रक्रिया अहवाल जिल्ह्यातील सर्व शाळा स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी सहभागी करून घेणे, प्रत्येक शाळेत हँडवॉश स्टेशनची निर्मिती करणे, मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, जिल्ह्यातील सर्व शाळांना डिसेंबर २०१६ पर्यंत प्रगत करणे, तालुक्याचा गुणवत्ता कक्ष अधिक सक्षम करून शाळांना सोयीसुविधा पुरविणे, शाळा सिद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, अप्रगत मुलांची केसस्टडी करून उपाययोजना करणे व त्यांना प्रगत करणे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा डिजीटल व आयएसओ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे, प्रभावी नियोजन करून मुलांचा विकास साधने आदी मुद्यांवर सभेदरम्यान चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान प्राचार्य डॉ. रमतकर यांनी उपस्थित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक मूल प्रगत करणे ही त्या शिक्षकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी साखरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी आत्राम यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नरेश वैद्य तर आभार डॉ. विनीत मत्ते यांनी मानले. यशस्वीतेसाठी डायटच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Make the students clean habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.