कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लसीकरण यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:12+5:302021-06-16T04:48:12+5:30
मालेवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. सध्या ...
मालेवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. ज्या गावात काेराेनाचा शिरकाव हाेईल, त्या गावात पावसाळ्यात यंत्रणा पाेहोचू शकणार नाही. पर्यायाने जीवितहानी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस टाेचावी, असे आवाहन सीईओंनी केले. उपस्थित सरपंच व अन्य नागरिकांमधील लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आली. सभेला तहसीलदार साेमनाथ माळी, संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. विनाेद म्हशाखेत्री, तालुका आराेग्य अधिकारी सचिन दामले, डाॅ. सतीश गाेगुलवार यांच्यासह सरपंच, पाेलीसपाटील, वैदू, गाव पुजारी, तलाठी, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, महिला बचतगटाच्या अध्यक्ष उपस्थित हाेत्या. संचालन विस्तार अधिकारी डी.पी. भाेगे यांनी केले.