विकास आराखडा बनविताना आधी साध्य ठरवा

By admin | Published: June 29, 2016 01:32 AM2016-06-29T01:32:54+5:302016-06-29T01:32:54+5:30

गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल .

Before making a development plan, you should first achieve it | विकास आराखडा बनविताना आधी साध्य ठरवा

विकास आराखडा बनविताना आधी साध्य ठरवा

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : तीन विभागांची संयुक्त बैठक
गडचिरोली : गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सोमवारीे केले. १४ वित्त आयोगाच्या निर्देशानुसार &‘‘आमचं गांव आमचा विकास’’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात यशदा व जिल्हापरिषद आणि प्रकल्प अधिकारी विकास यांची एक संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायत शब्द वापरण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गाव पातळीवर नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून यात प्रथम साध्य निश्चित करावे लागेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि उपजिविका यांचा स्तर उंचावतांना व्यक्तीनिहाय उत्पन्नवृद्धीचे नियोजन यात करण्यात यावे. या बैठकीत प्रकल्पअधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी एस. आर. धनकर, यशदाचे राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे आदींची उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्हयात पेसा गावांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे नमुने तयार करणार आहेत. याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. गावाचा विकास करताना काही प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून व्यक्तिक
बचत वाढू शकते. सोबतच कृषी यांत्रिकीकरणासारख्या उपायांची जोड दिली तर उत्पन्नवृद्धी होऊ शकते. याची सांगड घालून समूह विकासासोबतच वैयक्तिक विकासाकडेही लक्ष देणारे नियोजन असावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
१४ व्या वित्त आयोगातर्फे प्राप्त होणारा निधी, गावाला मिळालेला बक्षिसाचा निधी तसेच ५ टक्के पेसा निधी यांच्या जोडीला ग्रामपंचायतचा स्वत:चा निधी यावर हा उपक्रम आधारलेला आहे. गडचिरोलीत ग्रामपंचायतीव्यतिरिक्त गाव पातळीवर तेंदू व बांबू लिलावातून येणारा गावाचा पैसा या कामात वापरता यावा असा तांत्रिक बदल जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सुचविले. गावपातळीवर येत्या ५ वर्षात विविध क्षेत्राचे साध्य ठेवत ५ वर्षात विकास घडावा या दृष्टिने हा उपक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. यात वार्षिक आराखडा व पंचवार्षिक आराखडा आठ दिवसात तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Web Title: Before making a development plan, you should first achieve it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.