काेराेनासाेबतच कुपाेषणाकडेही लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:28+5:302021-07-12T04:23:28+5:30
संपूर्ण देशात काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे भय घोंगावत आहे. एवढेच नाही तर कोरोनानंतर म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस, झिका, बेल्सपालसी अशा नवीन ...
संपूर्ण देशात काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे भय घोंगावत आहे. एवढेच नाही तर कोरोनानंतर म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस, झिका, बेल्सपालसी अशा नवीन व्याधींनी डोके वर काढलेले आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. या सर्व रोगांच्या निर्मूलनासाठी औषधांपेक्षा रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांना रोगांनी ग्रासले नाही असे आढळते. राज्यात अनेक ठिकाणी कुपोषित बालकांचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्वाधिक धोका बालकांना असल्याचे सूतोवाच अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कुपोषित बालके असल्यास सर्वप्रथम ही बालके व त्यांच्या माता कोरोनाच्या बळी ठरतील. असे झाल्यास प्रचंड हाहाकार माजेल. ही परिस्थिती टाळण्यासाठी आज आपल्याकडे वेळ आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आतापासून शासनाने व प्रशासनाने म्हणजेच आरोग्य यंत्रणेने कुपोषित माता व बालकांचा शोध घेऊन त्यांच्या कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबविणे आवश्यक आहे, जेणेकरून ही बालके व माता कोरोनाचे बळी ठरणार नाही. त्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे.