काेठरी बाैद्धस्थळाच्या विकासकामांत गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:50+5:302021-01-08T05:57:50+5:30
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्यातील काेठरी येथील बाैद्धस्थळाच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या लाखाे रुपयांच्या निधीतून याेग्यरीत्या कामे करण्यात आली नाही. विकासकामे ...
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्यातील काेठरी येथील बाैद्धस्थळाच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या लाखाे रुपयांच्या निधीतून याेग्यरीत्या कामे करण्यात आली नाही. विकासकामे न करता रक्कम गहाळ केल्याच्या प्रकरणाची चाैकशी करून घाेटच्या तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, काेठरी येथील पवित्र बाैद्धस्थळास शासनाने २१ डिसेंबर २०१३ रोजी पर्यटनस्थळ म्हणून घाेषित केले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सदर बाैद्धस्थळाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ७४ लाख २० हजार १२२ रुपये मंजूर केले व हा निधी आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षकांकडे वर्ग केला. वनविभागाने प्राप्त निधी घाेट वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे वर्ग केला. घाेटचे तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी तनपुरे यांनी बाैद्ध विहार परिसरात विकासकामे दाखवून त्यांवर ३३ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे कागदाेपत्री दाखविले. या घाेटाळ्याची चाैकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना काॅंग्रेसचे पदाधिकारी काशिनाथ भडके, काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, आदी उपस्थित हाेते.