अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:43+5:302021-03-14T04:32:43+5:30
मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत घाेट पाेलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस मदत केंद्र घोट येथे सदर प्रकरणाबाबत भादंवी अन्वये ...
मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत घाेट पाेलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस मदत केंद्र घोट येथे सदर प्रकरणाबाबत भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा संवेदनशील असल्यामुळे घाेट पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप रोंढे यांनी स्वतःकडे तपासात घेतला आहे. मागील एक महिन्यापासून गुन्ह्याच्या तपासामध्ये विविध साक्षीदार तपासले तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये शोध घेतला असता अल्पवयीन मुलगी व अज्ञात इसमाचा शोध लागला नव्हता. परिणामतः पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून
मागील आठवड्यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील नदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या परिसरातून आरोपी यास अटक केली. तसेच पीडितेस ताब्यात घेऊन पोलीस मदत केंद्र घोट येथे परत आणले. आराेपीला सत्र न्यायालय गडचिरोली येथे हजर केले असता न्यायालयाने आराेपीला दोन दिवसांची पोलिस काेठडी सुनावली हाेती. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविले. महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांचे आदेशान्वये पीडितेस तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सदर कामगिरी उपविभागीय पोलिस अधीकारी भाऊसाहेब ढोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हस भुसारी साहेब स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गर्शनाखाली सापोनी संदिप रोंढे, पोलीस अमलदार रतन रॉय, अभिमन्यु सदांशिव. महिला पोलीस अमलदार शितल घोडाम यांनी केली.