सहा दशकांपासून जीर्ण इमारतीतूनच चालताे ग्रा.पं.चा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:41 AM2021-09-23T04:41:44+5:302021-09-23T04:41:44+5:30
तिमरम ग्रामपंचायतअंतर्गत गुड्डीगुडम, तिमरम स., झिमेला, तिमरम म. आदी गावे येतात. येथील लोकसंख्या २ हजारांच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या ...
तिमरम ग्रामपंचायतअंतर्गत गुड्डीगुडम, तिमरम स., झिमेला, तिमरम म. आदी गावे येतात. येथील लोकसंख्या २ हजारांच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कार्यालयसुद्धा माेठे असणे आवश्यक हाेते; परंतु जागा अपुरी पडत आहे. १९६२ मध्ये तिमरम येथे ग्रामपंचायतची स्थापना झाली. त्यानंतर येथे इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सध्या या इमारतीला ५८ वर्षांचा कालावधी उलटला; परंतु दरम्यानच्या काळात इमारतीची केवळ दुरुस्ती करूनच कार्यालय चालविले जात आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना नवीन इमारत मिळाली. मात्र, तिमरम ग्रामपंचायतीला नवीन इमारतीची प्रतीक्षाच आहे. संरक्षक भिंतीचाही अभाव असल्याने माेकाट जनावरे व अन्य पाळीव प्राण्यांचा वावर परिसरात अनेकदा दिसून येताे.
बाॅक्स
ग्रामसभेसाठी जागा अपुरी
ग्रामपंचायत तिमरम येथील सभागृह आकाराने लहान असल्याने केवळ ६० ते ७० नागरिकच येथे बसू शकतात. उर्वरित लाेकांना कार्यालयाच्या बाहेर बसूनच ग्रामसभेतील चर्चा व विचार ऐकावे लागतात. एखादी मोठी सभा, तेंदू लिलाव प्रक्रिया सभा, ग्रामसभा किंवा अन्य सभेला जागेअभावी माेजकेच लाेक उपस्थित राहतात. अन्य बैठकासुद्धा येथे घेता येत नाहीत. त्यामुळे नवीन इमारतीची आवश्यकता आहे.
180921\084430285844img-20210918-wa0055.jpg
Timram स्थित guddigudam ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारतीच्या प्रतिक्षेत...
ग्रामपंचायत कार्यालय स्थित.. छाया