मन्नेवार समाजाची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:39 PM2018-11-19T22:39:42+5:302018-11-19T22:39:59+5:30

आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी मन्नेवार समाज बहुउद्देशीय सेवा संस्था आलापल्लीच्या नेतृत्वात सिरोंचा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

Mannwar society attacked in Tehsil | मन्नेवार समाजाची तहसीलवर धडक

मन्नेवार समाजाची तहसीलवर धडक

Next
ठळक मुद्देसिरोंचात मोर्चा : जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी मन्नेवार समाज बहुउद्देशीय सेवा संस्था आलापल्लीच्या नेतृत्वात सिरोंचा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
अहेरी, सिरोंचा तालुक्यातील मन्नेवार समाजाचे नागरिक आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत १८ व्या क्रमांकावर मन्नेवार जमातीचे नाव आहे. १०५० पूर्वीचे पुरावे असतानाच सुध्दा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहे. या समाजाकडून मागील ३० वर्षांपासून शासनाकडे अनेकवेळा निवेदने पाठविण्यात आली. मोर्चे, उपोषण करण्यात आले. मात्र शासनाने सुध्दा या समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण, नोकरी आदी कामांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे अडचण वाढली आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांचे नोकरी व शिक्षणाचे दरवाजे बंद झाले आहेत. परिणामी अनेकांनी शिक्षण सोडले आहे. सदर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्याचबरोबर बेरोजगारी, अशिक्षीतपणा गांजत चालला आहे. मानेवार समाजातील नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व अशोक पुल्लूरवार, प्रशांत कोपुलवार, आशिष वनम, गीता दासरवार, माला राऊत, मंगरी तिम्मा, आशिष मडावी, आनंद वाकडे, सुमन मेश्राम, पांडुरंग आडे, मासु तिम्मा, दीपक लटारे, पंकज पुंगाटी, पद्माकर नार्लावार, सुनिता नार्लावार, संदीप जोशी, जिजाबाई जुवारे, श्रावण बारसागडे, दलसू तांदो, वंदना शेंडे, राजेश पैडाकूलवार, प्रदीप लटारे यांनी केले. आंदोलनात मन्नेवार समाजातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Mannwar society attacked in Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.