‘आदर्श’ मुख्याध्यापकाच्या वागणुकीने दिव्यांग केंद्रप्रमुखासह अनेक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:09 AM2021-02-06T05:09:00+5:302021-02-06T05:09:00+5:30
केंद्रप्रमुख गोटपर्तीवार हे दिव्यांग असून २५ जून २०२० पासून आष्टी केंद्राचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. त्यामुळे आष्टी परिसरातील अनेक ...
केंद्रप्रमुख गोटपर्तीवार हे दिव्यांग असून २५ जून २०२० पासून आष्टी केंद्राचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. त्यामुळे आष्टी परिसरातील अनेक शाळांशी त्यांचा संबंध येताे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुनघाडा येथील मुख्याध्यापक पी. पी. आचेवार यांच्याशीही ते संपर्कात असतात. मुख्याध्यापक आचेवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. परंतु त्यांचे वर्तन अशाेभनीय आहे, असा आरोप गाेटपर्तीवार यांनी केला आहे. ते नेहमी प्रशासकीय कामात अडथळा आणून व्हाॅट्सॲप ग्रुपवर अर्वाच्य चॅटिंग करीत असतात. २० जानेवारीला निवडणुकीच्या कामावरून परत आल्यानंतर यासंदर्भात आचेवार यांच्याकडून माहिती मागितली, तेव्हा आचेवार यांनी अशोभनीय भाषेत पहाटे ३ वाजेपर्यंत शिवीगाळ करून आपला अवमान केला. तसेच जीविताबाबत धमकी दिली. त्यामुळे आपल्याला काही झाल्यास मुख्याध्यापक आचेवार हे जबाबदार राहतील, असे गाेटपर्तीवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात पालकमंत्री, शिक्षणमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्षांनाही निवेदन पाठविले आहे.
बाॅक्स
- ...तर पाेलिसात तक्रार करणार
मुख्याध्यापक आचेवार हे प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत. परंतु महिला शिक्षिका असलेल्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर त्यांनी शिक्षकी पेशाला अशाेभनीय भाषा वापरून अर्वाच्य शिवीगाळ केली. आपण दिव्यांग कर्मचारी असून, अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६चे कलम २२ व २३ नुसार आचेवर यांच्यावर कारवाई करावी. सदर मुख्याध्यापकावर आठ दिवसात कारवाई न केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे केंद्रप्रमुख गाेटपर्तीवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
काेट
केंद्रप्रमुखांना शिवीगाळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. यात मुख्याध्यापक दाेषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
नरेंद्र म्हस्के, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चामोर्शी