अनेक दिव्यांगांना मिळाले जगण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:10 PM2018-12-24T22:10:42+5:302018-12-24T22:11:06+5:30

राज्य दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने क्रीडा संकूल आलापल्ली येथे मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना जगण्याचे नवीन बळ मिळाले आहे.

Many demons have the power to live | अनेक दिव्यांगांना मिळाले जगण्याचे बळ

अनेक दिव्यांगांना मिळाले जगण्याचे बळ

googlenewsNext
ठळक मुद्देआलापल्लीत मेळावा : अपंगत्वावर मात करण्यासाठी ट्रायसिकलसह विविध साहित्य वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : राज्य दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने क्रीडा संकूल आलापल्ली येथे मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना जगण्याचे नवीन बळ मिळाले आहे.
मेळाव्याचे उद्घाटन अहेरीचे पोलीस निरिक्षक सतीश होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती माधुरी उरेते होत्या.
संगीता जागोबा बोरकर, कल्पना रैनू उसेंडी, धनंजय चक्रपाणी कवीराज, मंगला यादव पुराम, तोषमा गिरीधर निकुरे, अनिल चुक्कू आत्राम, योगराज वासुदेव सपाटे, जितेंद्र दहिकर, गोपाल बाबुराव हिरापुरे यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये चार ट्रायसिकल, दोन व्हिलचेअर, एक वॉकर, दोन स्क्रॅचेस यांचा समावेश आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना सतीश होळकर यांनी अपंगत्वावर मात करून स्वावलंबी जीवन जगावे. अपंगांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बंडू कुमरे, आनंद गुरनुले, दिलीप मडावी, लालाजी पिपरे, गोकुल बद्दलवार, विजय एडलावार, मुमताज शेख, शिवप्रसाद दोंतुलवार, अमित नाईक, सत्यनारायण रामगिरवार, अजय पुष्पनुरवार, देवानंद बुध्दावार, श्रीनिवास पुल्लूरवार, मधुकर मच्छावार, अनिता आत्राम, सुरेश मल्लेम पेल्लीवार, राजश्री मेश्राम यांनी सहकार्य केले.
संचालन लक्ष्मण वाढई, काशिनाथ रूखमोडे, तर आभार अतुल मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Many demons have the power to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.