अनेक शेतकरी पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:29+5:30
जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पीक लागवडीसाठी सेवा सहकारी साेसायटी मार्फत बँकेकडून पीक कर्ज घेत असतात. पीक कर्जाच्या रकमेतून पीक विका रक्कम कपात करून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाते. यावर्षी खरिपातील पिकांना महापूर व राेगाचा प्रचंड फटका बसला. मात्र केवळ महापुराच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले. मात्र शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाची रक्कम अजूनही मिळाली नाही. शासन व प्रशासनाचे धाेरण चुकीचे असल्याचा आराेप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. चामाेर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
वातावरणाच्या बदलामुळे पिकांचे नुकसान
सध्या खरीप हंगामातील भाजीपाला व कडधान्य पिके जाेमात आहेत. मात्र अधूनमधून ढगाळी वातावरण राहत असल्याने पिकांवर परिणाम हाेत आहे. विविध प्रकारची कीड व राेगाचा प्रादुर्भाव तूर, उडीद आदी पिकांवर दिसून येत आहे. एकूणच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी दुष्काळाच्या संकटात सापडत आहे. शासनानेही अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.