मजुरांसाठी सरसावले अनेक हात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:16+5:30

तेलंगणा व आंध्रप्रदेशातून स्वगावी परत येणारे अनेक मजूर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी येथे पोहोचताच पोलिसांनी चेकपोस्टजवळ थांबविले. परत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मागील दोन दिवसांपासून गावाच्या प्रवासाने निघालेल्या मजुरांच्या पोटात एकही कण नव्हता. ते थकलेले होते.

Many hands for the workers' | मजुरांसाठी सरसावले अनेक हात'

मजुरांसाठी सरसावले अनेक हात'

Next
ठळक मुद्देआष्टीत सामाजिक दायित्व : तेलंगणा व आंध्रप्रदेशातून येणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर तेलंगणा व आंध्रप्रदेशात मिरची तोडण्याकरिता गेले होते. केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर अनेक मजूर आष्टीमार्गे गावाकडे परत येत आहेत. यापैकी अनेक मजुरांची आष्टी येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.
तेलंगणा व आंध्रप्रदेशातून स्वगावी परत येणारे अनेक मजूर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी येथे पोहोचताच पोलिसांनी चेकपोस्टजवळ थांबविले. परत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मागील दोन दिवसांपासून गावाच्या प्रवासाने निघालेल्या मजुरांच्या पोटात एकही कण नव्हता. ते थकलेले होते. त्यांची ही अडचण ओळखून पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी सर्व मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. पहिल्या दिवशी पोलीस स्टेशनतर्फे जेवण देण्यात आले. त्यानंतर आष्टी येथील अनेक दानदात्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अन्नदान केले. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, मुकेश नारंग, सन्नी रेवडी, गुरू जयपूरकर, डॉ.रवी बुर्लावार, पराग बोमपल्लीवार, दिवाकर कुंदोजवार, व्यंकटी बुर्ले, शंकर मारशेट्टीवार, प्रा.श्याम कोरडे, मंगेश पोरटे, राजकुमार वैद्य, ग्रामसेवक इंद्रावण बारसागडे, रवी झोडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी फळे, नाश्ता, पाणी व जेवणाची व्यवस्था केल्याने उपाशी असलेल्या मजुरांना अन्न मिळाले.

स्वयंपाकासाठी पोलिसांनी केले सहकार्य
तेलंगणात अडकलेल्या मजुरांना स्वगावी जाण्याची परवानगी शासनाकडून मिळाल्याने गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील अनेक मजुरांचे लोंढे जिल्ह्याच्या सीमेवर येण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत अनेक मजूर दाखल झाले आहेत. आष्टी येथे आलेल्या मजुरांची जेवणाची व्यवस्था पोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. परंतु मजुरांची गर्दी पाहून आवश्यक प्रमाणात अन्न शिजविण्यासाठी स्थानिक मनुष्यबळ कमी होते. ही गरज ओळखून पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी स्वयंपाकाला हातभार लावला. मिरची, टमाटे चिरण्यासाठी मदत केली. तसेच पीएसआय जयदीप पाटील यांनीही स्वयंपाक करणाºया कारागिराला मदत करून मजुरांना भोजन दिले. संकटकाळात पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल मजुरांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: Many hands for the workers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.