नगरपरिषदमध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:43+5:302021-03-06T04:34:43+5:30
आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ५ आगस्ट २०१८ ला आरमोरी नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाले मात्र अडीच वर्षाचा ...
आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ५ आगस्ट २०१८ ला आरमोरी नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाले मात्र अडीच वर्षाचा कालखंड होऊनही प्रशासनाचा कामकाज चालविण्यासाठी नगरपरिषद मध्ये आवश्यक असलेली अनेक पदे भरण्यात आली नाही. पदे रिक्त असल्याने त्याचा विकासकामांवर प्रभाव पडत असून अनेक कामे खोळंबत आहेत. शिवाय नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम व विकासात्मक कामे करताना कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे.
आरमोरी नगरपरिषदमध्ये महत्वाची असलेली २१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये लिपिक टंकलेखक ३, स्वच्छता निरीक्षक ३, गाळणी चालक/प्रयोगशाळा सहाय्यक १, पंप आपरेटर/विजतंत्री १, तारतंत्री/वायरमन ३, मुकादम ४, सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक १, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी १, लेखा परीक्षक १, स्थापत्य अभियंता १, नगर रचनाकार सार्वजनिक बांधकाम १, पाणी पुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता १ आदी महत्वाची पदे रिक्त आहेत. नगरपरिषद अस्तित्वात येऊन अडीच वर्षाचा कालखंड लोटला असतानाही ती भरण्यात आली नाही रिक्त पदामुळे विकास कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आप्पा उर्फ प्रशांत सोमकुवर यांनी केली आहे.