अभ्यास मंडळांवर अनेक सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:44 AM2017-12-15T00:44:55+5:302017-12-15T00:46:57+5:30

गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते.

Many members of the study boards are unconstitutional | अभ्यास मंडळांवर अनेक सदस्य अविरोध

अभ्यास मंडळांवर अनेक सदस्य अविरोध

Next
ठळक मुद्देसात मंडळांसाठीच निवडणूक : सकाळी जाहीर झाला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. मात्र फक्त ३६ अभ्यास मंडळांकरिता नामनिर्देशनपत्र आले होते. त्यापैकी २९ अभ्यासकमंडळांकरिता ३ व त्यापेक्षा कमी नामांकन आले. त्यामुळे केवळ ७ अभ्यास मंडळांसाठी निवडणूक झाली.
यात विज्ञान व तंत्रज्ञान गटात भौतिकशास्त्र विषयासाठी डॉ.पांडुरंग मोहरकर, रमेश ठोंबरे व रणजित मंडल, रसायनशास्त्रासाठी अपर्णा धोटे, प्रवीण जोगी, डॉ.व्ही.के. बत्रा, गणितासाठी डॉ.चेतना भोंगडे, डॉ.लालसिंग खालसा व डॉ.ज्ञानदेव वºहाडे, या गटात बिनविरोध निवडल्या गेलेल्यांमध्ये जनरल इंजिनिअरिंग अप्लाईड सायन्स अ‍ॅन्ड ह्युमॅनिटी विषयासाठी व्ही.एस.गोगुलवार, ए.एस.पावडे, एन.एस.बिसेन, इलेक्ट्रीकल इंजिनिअर विषयासाठी जाफर खान, राजेंद्र धात्रक, कॉम्प्युटर टेक्निकसाठी रहिला शेख, जीव रसायनशास्त्रसाठी डॉ.गोपाल गोंड, भूविज्ञानशास्त्रसाठी डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. किशोर कोरडे, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्र्युमेंटेशनसाठी डॉ. अमृत लांजे, डॉ. धनंजय गहाणे, पर्यावरण विज्ञानसाठी महेंद्र ठाकरे, डॉ. बालसुब्रह्मण्यम श्रीनिवास, डॉ. केशव कळसकर, सुक्ष्म जीवशास्त्रासाठी डॉ. विजय वाढई, डॉ. प्यारेलाल कुंभारे, अजय सोळुंखे, भाषा व विज्ञानसाठी ज्योती तायगान, डॉ. मिनाक्षी तुंबडे, संभारी वरकड, प्राणीशास्त्रासाठी डॉ. लक्ष्मण रोहणकर, अमिर धमानी, गणपत देशमुख, वनस्पतीशास्त्रासाठी डॉ. वसंती रेवतकर, अनिल कोरपेनवार, संजय दुधे, सिव्हील स्थापत्य अभियांत्रिकीसाठी डॉ. ए. झेड. चिताळे, डॉ. ए. पी. सिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रविण पोटदुखे, राजेश ठोंबरे, विनोद गोरंटीवार, मायनिंग इंजिनिअरींगसाठी मनिष उत्तरवार, इन्स्ट्र्युमेंटेशन इंजिनिअरींगसाठी नवनाथ नेहे याशिवाय वाणिज्य व व्यवस्थापनसाठी डॉ. रवींद्र मुरमाडे, यशवंत घुमे, श्रीलता पिल्लई यांची निवड झाली.
बिझनेस एडमिनीस्ट्रेशन अ‍ॅन्ड मॅनेजमेंटसाठी डॉ. रेखा मेश्राम, जयदेव देशमुख, उत्तम घोसरे, बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी तात्याजी गेडाम, हरिश्चंद्र कामडी, डॉ. बंडू जांभुळकर, अकाऊंट स्टॅटीकस्टीकसाठी उत्तमचंद कांबळे, सुखदेव उमरे, डॉ. विजय टोंगे, विज्ञानसाठी डॉ. विश्वनाथ लाडे, डॉ. सुनिल नरांजे, चंद्रभान जीवणे, हिंदीसाठी डॉ. सुनिता बन्सोड, डॉ. कल्पना कावळे, डॉ. सरीता तिवारी, मराठीसाठी अनमोल शेंडे, डॉ. सुदर्शन दिवसे, डॉ. धनराज खानोरकर, इतिहाससाठी भुपेश चिकटे, दिवाकर कामडी, डॉ. शरद बेलोरकर, भूगोलसाठी योगेश्वर दुधपचारे, डॉ. रवींद्र रणदिवे, इंग्रजीसाठी डॉ. चंद्रमौली अमुदला, बालकृष्ण कोंगरे, सुनिल बिडवाईक, अर्थशास्त्रासाठी डॉ. पी. बी. तितरे, जनार्धन काकडे, श्रीराम कावळे, समाजशास्त्रासाठी राजेंद्र बारसागडे, डॉ. दिवाकर उराडे, पंढरी वाघ यांची निवड झाली.
गृहअर्थशास्त्रासाठी सरोज झंझाळ, डॉ. वंदना वैद्य, अमिता बन्नोरे, संगीतसाठी प्रमोद रेवतकर, विधीसाठी डॉ. एम. जे. बेन्नी, इजाज शेख, इन्युघंटी राव, राज्यशास्त्रासाठी अशोक बहादुरे, डॉ. दिनकर चौधरी, अशोक खोब्रागडे, समाजकार्यासाठी डॉ. सुनिल साकुरे यांची अविरोध निवड झाली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचा असाही कारभार
बुधवार दिनांक १३ ला सकाळी ९ वाजता गडचिरोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष शेवटचा निकाल जाहीर करण्यास गुरूवारची पहाट उगवली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे, मतमोजणी प्रक्रिया आटोपताच निवडणूक निकालाची जबाबदारी सांभाळणारे कुलसचिव दीपक जुनघरे मोबाईल बंद करून सायंकाळपर्यंत विद्यापीठात आलेच नाही. कुलगुरू कल्याणकर काही वेळासाठी आले पण प्रसारमाध्यमांना निकालाची प्रत शुक्रवार दिनांक १४ डिसेंबरला दिली जाईल, असे सांगत त्यांनीही विद्यापीठातून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता कुलसचिव जुनघरे यांनी निकालाची प्रत जाहीर केली.

Web Title: Many members of the study boards are unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.