वनविभागाची अनेक निवासस्थाने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांविना जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:41 AM2021-09-05T04:41:09+5:302021-09-05T04:41:09+5:30
वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वनसंपदेचे संरक्षण करावे या स्तुत्य हेतूने कर्मचाऱ्यांकरिता शासनाद्वारे लाखो रुपये खर्ची घालून ...
वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वनसंपदेचे संरक्षण करावे या स्तुत्य हेतूने कर्मचाऱ्यांकरिता शासनाद्वारे लाखो रुपये खर्ची घालून निवासस्थाने उभारण्यात येतात. मात्र प्राणहिता वनपरिक्षेत्र व कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वनकर्मचारी मुख्यालयी न राहता तालुकास्थळावरून ये-जा करीत सेवा देत आहेत. परिणामी या वनक्षेत्रातील वनसंपतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी याकरिता वनविभागाद्वारे प्रशस्त अशी निवासस्थानेही उभारण्यात आली. मात्र या निवासस्थानी कर्मचारी राहत नसल्याने या इमारतींची दैन्यावस्था झाली आहे. अनेक इमारती देखभालीअभावी मोडक्या अवस्थेत आली आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता विविध भत्त्यांची उचल करीत असताना याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनीही कानाडोळा केला आहे. त्यामुळे मुख्यालयाला खो देणाऱ्या या वनकर्मचाऱ्यांना सक्तीची कारवाई करावी, अशीही मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
बॉक्स
देखभाल दुरुस्तीवरही मोठा खर्च
वनाधिकाऱ्यांसह कर्मचारी मुख्यालयातील या निवासस्थानी राहत नसल्याने अनेक इमारतींची दैन्यावस्था झाली आहे. अनेक इमारती मोडक्या अवस्थेत आहेत. वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या देखभालीवरही शासन दरवर्षी मोठा खर्च करीत आहेत. इमारतींवर एवढा खर्च होत असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती का केली जात नाही, असाही प्रश्न ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे.
040921\img-20210903-wa0064.jpg
शासनाचे निवास स्थानावरील लाखो रुपये पाण्यात