कामगार हितासाठी अनेक योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:02 AM2018-12-02T01:02:56+5:302018-12-02T01:04:13+5:30
कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
अनुगामी लोकराज्य महाअभियान, अनुलोम सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नगरी येथे बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, अनुलोमचे जिल्हा समन्वयक संदीप लांजेवार, नोंदणी अधिकारी राजेंद्र भानारकर, नगरीचे सरपंच अजय म्हशाखेत्री, मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक शेषराव नागमोती, शुभम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या वतीने अनुलोमच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नोंदणीकृत कामगारांना विविध लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात पाच हजार रूपये जमा करण्यात येणार असून त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी १५ ते ३० हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जास्तीत जास्त कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले.