अनेकांचे स्वयंस्फूर्त रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:55 PM2019-07-02T22:55:17+5:302019-07-02T22:55:34+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (२ जुलै) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी २४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून या उपक्रमाला दाद दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (२ जुलै) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी २४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून या उपक्रमाला दाद दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांच्या हस्ते बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलित करून रक्तदान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शैलजा मैैदमवार, विनायक बोरकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी हरिष सिडाम, डॉ.अंजली साखरे, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सतीश तडकलावार, समता खोब्रागडे उपस्थित होते.
लोकमत कार्यालयातील कर्मचारी, लोकमत सखी मंचच्या सदस्य व इतर नागरिक अशा २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक मिथून कोहळे, लोकमतचे उपसंपादक दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, आॅपरेटर विवेक कारेमोरे, निखिल जरूरकर, श्रीरंग कस्तुरे, नीलेश धाईत, विकास चौधरी, सखी मंच सदस्य नलिनी बोरकर, सोनिया बैस, प्रीती मेश्राम, तृप्ती अलोणे, रोहिनी मेश्राम, अर्चना भांडारकर, मंगला बारापात्रे, वंदना दरेकर, पुष्पा पाठक, मृणाली मेश्राम, स्वाती पवार, श्वेता बैस, स्मिता सरदार यांनी सहकार्य केले.