गोंडवानाच्या वर्धापनदिनी अनेकांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:27 AM2018-09-30T00:27:11+5:302018-09-30T00:28:16+5:30

गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २ आॅक्टोबर रोजी र्सचचे संचालक डॉ. अभय बंग यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Many will be honored on the anniversary of Gondwana | गोंडवानाच्या वर्धापनदिनी अनेकांचा होणार गौरव

गोंडवानाच्या वर्धापनदिनी अनेकांचा होणार गौरव

Next
ठळक मुद्देकुलगुरूंची माहिती : रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २ आॅक्टोबर रोजी र्सचचे संचालक डॉ. अभय बंग यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट वार्षिकांक महाविद्यालय आदी पुरस्कार देऊन अनेकांचा विद्यापीठातर्फे गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते होणार आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत महाविद्यालयामार्फत विविध उपक्रमांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, शिवाय शैक्षणिक सत्रात जिल्ह्याचा नाव लौकिक व्हावा या उद्देशाने विद्यापीठामार्फत विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित केल्या जाते,असे कुलगुरूंनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, प्रा. मनीष उत्तरवार उपस्थित होते. महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. नसरूद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, गोविंदराव वारजुरकर महाविद्यालय नागभिडचे प्राचार्य डॉ. संजय आर. सिंग यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे प्रा. डॉ. विजय एस. वाढई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विजय शेलारे यांना उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार, डॉ. सुभाष देशमुख यांना उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार सुधीर पिंपळशेंडे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, विशाल गौरकार यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एसपी महाविद्यालय चंद्रपूरचे अमोल कांबळे यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, मयुरी चिमुरकर यांना उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय आंतर महाविद्यालय वार्षिकांकाचा प्रथम पुरस्कार नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कुरखेडाच्या गोविंदराव कला व विज्ञान महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महिला महाविद्यालय गडचिरोली व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांना वार्षिकांकाचा उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट रासेयो पुरस्कार
निकीता वरंभे, कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी, जि. चंद्रपूर (चंद्रपूर जिल्हा)
विश्वेश्वरी पुडो, जेएसपीएम महाविद्यालय धानोरा (गडचिरोली जिल्हा)

हे आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार
उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय एकक पुरस्कारासाठी तीन महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर (विद्यापीठस्तरीय), वनश्री महाविद्यालय कोरची (गडचिरोली जिल्हा), आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर (चंद्रपूर जिल्हा) आदींचा समावेश आहे.
उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कारांसाठी तीन प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे प्रा. कुलदीप गोंड यांना विद्यापीठस्तरीय पुरस्कार तसेच वनश्री महाविद्यालय कोरचीचे प्रा. प्रदीप चापले यांना गडचिरोली जिल्ह्याचा तर आठवले समाज कार्य महाविद्यालय चिमूरचे प्रा. दिवाकर कुंमरे यांना चंद्रपूर जिल्ह्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Many will be honored on the anniversary of Gondwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.