जहाल माओवादी शंकर कुड्यामला अटक; दीड लाखाचे बक्षीस

By गेापाल लाजुरकर | Published: May 3, 2024 08:49 PM2024-05-03T20:49:46+5:302024-05-03T20:50:41+5:30

तीन खुनांमध्ये हाेता प्रत्यक्ष सहभाग

maoist shankar kudyam arrested | जहाल माओवादी शंकर कुड्यामला अटक; दीड लाखाचे बक्षीस

जहाल माओवादी शंकर कुड्यामला अटक; दीड लाखाचे बक्षीस

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली : जिल्ह्यातील विविध भागात नक्षली कारवाया व चकमकींमध्ये सहभागी असलेल्या शंकर वंगा कुड्याम (३४) या जहाल माओवाद्यास सिरोंचा पोलिस स्टेशनमधील पाटी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­ऱ्या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान ३ मे राेजी अटक करण्यात आली. शंकर कुड्यामवर दीड लाखाचे बक्षीस हाेते.

फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. यादरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ व देशविघातक कृत्य करतात. सुरक्षा दलांविरुद्धच्या अशाच अनेक हिंसक घटनांमध्ये शंकर कुड्यामचा सक्रिय सहभाग हाेता. जहाल माओवादी शंकर कुड्याम हा छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्याच्या भाेपालपट्टनम तालुक्यातील कांडलापारती येथील रहिवासी आहे. शंकर हा कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा आहे.

या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना रेशन पुरवणे, गावातील लोकांना मिटिंगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांविरुध्द कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लावणे, अशी कामे तो करीत होता. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७९ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. शंकर कुड्यामच्या अटकेची कारवाई पाेलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात

या चकमकीत हाेता सहभाग

शंकर वंगा कुड्याम हा २०१५ पासून नॅशनल एरिया कमिटीमध्ये भरती होऊन आजपर्यत माओवादी चळवळीतील कामे करत होता. २०२२ मध्ये मोरमेड-चिंतलपल्ली, २०२३ मध्ये बडा-काकलेर, डम्मुर-बारेगुडा (छ.ग.) तसेच २०२४ मध्ये अहेरी तालुक्याच्या लिंगमपल्ली-मोदुमडगू (म.रा.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीत प्रत्यक्षरित्या सहभाग होता. ज्यामध्ये ४ माओवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले होते.

तीन लाेकांच्या खुनात सहभाग

शंकर याचा तीन लाेकांच्या खुनांत सहभाग हाेता. २०२४ मध्ये काेंजेड, तसेच कचलेर व छत्तीसगड राज्याच्या भाेपालपट्टनम येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग हाेता.

 

Web Title: maoist shankar kudyam arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.