मार्र्कं डादेव तीर्थस्थळी गंगापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:31 AM2019-02-28T01:31:57+5:302019-02-28T01:32:44+5:30

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मार्कंडादेव येथे आदिवासी समाजातर्फे गोंडियन धर्म रीतीरिवाजाप्रमाणे बुधवारी गंगापूजन करण्यात आले. पूजेचा पहिला मान मार्कंडा येथील सुनीता मरस्कोल्हे व त्याचे पती सीताराम मरस्कोल्हे तसेच चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांना सपत्नीक देण्यात आला.

Marcn Dadev Gangetic Places | मार्र्कं डादेव तीर्थस्थळी गंगापूजन

मार्र्कं डादेव तीर्थस्थळी गंगापूजन

Next
ठळक मुद्देआदिवासी समाजातर्फे कार्यक्रम : ग्रामसभांचे पदाधिकारी हजर

लोकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मार्कंडादेव येथे आदिवासी समाजातर्फे गोंडियन धर्म रीतीरिवाजाप्रमाणे बुधवारी गंगापूजन करण्यात आले.
पूजेचा पहिला मान मार्कंडा येथील सुनीता मरस्कोल्हे व त्याचे पती सीताराम मरस्कोल्हे तसेच चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांना सपत्नीक देण्यात आला. सर्वप्रथम मार्कंडेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर वैनगंगा नदी मातेची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, छबीलदास सुरपाम, सीताराम मडावी, गोपिनाथ कोवे, सुधाकर उइके आदी उपस्थित होते. तसेच पारंपरिक इलाका ग्रामसभा सगणापूरच्या हद्दीत ५२ गावे व चौडमपल्ली ग्रामसभा इलाक्याच्या हद्दीत ५० गावे येतात. या गावातील आदिवासी नागरिक व ग्रामसभेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.एस.बी.कोडापे, उपाध्यक्ष गोपीनाथ उईके, सचिव हरिदास टेका, प्रकाश गावडे, बंडू मडावी आदी उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त ४ मार्चला पेरसापेन पूजा करण्यात येणार आहे.
मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त विदर्भाच्या कानाकोपऱ्यासह महाराष्टÑ व लगतच्या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. या यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. आतापासूनच मनोरंजनात्मक साधनेही येथे दाखल झाली आहेत. मार्च महिन्याच्या १ तारखेपर्यंत सर्व मनोरंजन साधने बसविण्यात येणार आहे. शिवाय विविध वस्तू विक्री करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनीही जागा आरक्षित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक जण ग्रामपंचायत तसेच तालुका प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. एकूणच जत्रेची चाहूल लागली आहे.

मार्कंडादेव जत्रेची तयारी जोमात
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ४ मार्चपासून १० ते १२ दिवस मोठी जत्रा भरणार आहे. या जत्रेच्या पहिल्या दिवशी ४ मार्च रोजी सोमवारला पहाटेच्या सुमारास राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मार्कंडेश्वराची मुख्य पूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी दिली आहे. महाशिवरात्रीच्या मुख्य पूजेला मार्कंडादेव येथे गुरव समाजामधून पंकज पांडे व त्यांची पत्नी शुभांगी पांडे तसेच खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्य पूजा पहाटे ४ वाजतापासून होणार असून ही पूजा आटोपल्यानंतर भाविकांना मुख्य मंदिरात मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया जत्रेच्या अनुषंगाने मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध सोयीसुविधा देण्यात येणार आहे. चामोर्शी तालुका प्रशासनाकडून त्यासाठी तयारी सुरू आहे.

Web Title: Marcn Dadev Gangetic Places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.