मारोडात विकास कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:40 AM2018-04-19T01:40:07+5:302018-04-19T01:40:07+5:30
मारोडा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मारोडा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे श्रीकृष्ण कावनपुरे, सरपंच ज्ञानेश्वरी मडावी, उपसरपंच प्रतिभा कोल्हेवार, सचिव विनोद कोटगिरवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मडावी, राजेश मेश्राम, जनार्धन सोदगिरवार, कुमोद माधमवार, रमेश पेधलवार, जनार्धन तुनघलवार, नरेंद्र बांबोळे, रेमाजी माधमवार, हरिकांत चापले आदी उपस्थित होते.
पेकिंगकसा व कर्काझोरा गावात ठक्करबापा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत गोटूलचे बांधकाम केले जात आहे. आमदार निधीतून ग्रामपंचायतीला संरक्षण भिंत व मारोडा येथे नालीचे बांधकाम केले जाणार आहे. या सर्व बांधकामांचे भूमिपूजन आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. पेकिंगकसा व कर्काझोरा या गावात गोटूलचे बांधकाम झाल्यामुळे गावातील नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी हक्काची इमारत उपलब्ध झाली आहे.