मार्र्कं डात उसळला महिला भाविकांचा जनसागर

By admin | Published: September 19, 2015 01:59 AM2015-09-19T01:59:48+5:302015-09-19T01:59:48+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त १८ सप्टेंबर रोजी शुक्रवारला महामृत्युंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी हजारो महिला भाविकांची गर्दी उसळली होती.

Marrakkal women devotees of the masses | मार्र्कं डात उसळला महिला भाविकांचा जनसागर

मार्र्कं डात उसळला महिला भाविकांचा जनसागर

Next

ऋषी पंचमीनिमित्त : पूजाअर्चा, पवित्र स्नान व धार्मिक विधी आटोपला
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त १८ सप्टेंबर रोजी शुक्रवारला महामृत्युंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी हजारो महिला भाविकांची गर्दी उसळली होती. मार्र्कंडादेव येथे उत्तर वाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावर स्नान व मंदिरात पूजाअर्चा तसेच धार्मिक विधी पूर्ण करण्यात आला.
महाशिवरात्री, श्रावणमास, अधिकमासासोबतच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मार्र्कं डादेव येथे मोठी गर्दी होत असते. ऋषी पंचमीनिमित्त गुरूवारपासूनच भाविकांचे जत्थे मार्र्कंडादेव नगरीत दाखल होत होते. शुक्रवारी सकाळपासूनच महिला भाविकांचा जनसागर मार्र्कंडादेव येथे उसळला. मार्र्कंडादेव मंदिरालगत असलेल्या उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या तिरावर पूजाअर्चा, ऋषीपंचमीचे महात्म्य व पवित्र स्नानासाठी महिला भाविकांचा उत्साह प्रचंड दिसून येत होता.
ऋषी पंचमीनिमित्त सप्तऋषी उपासना करून उपवास करावा, हे व्रत वैकल्य सतत सात वर्ष केल्यानंतर या व्रताचे अध्यापन केले जाते, अशी आख्यायिका आहे. याकरिताच शुक्रवारी महिला भाविक मोठ्या संख्येने मार्र्कं डादेव येथे दाखल झाल्या होत्या, अशी माहिती येथील पुजाऱ्यांनी दिली. येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी मार्र्कंडेश्वर ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील महिला भाविक मोठ्या संख्येने मार्र्कंडा तीर्थस्थळी दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मार्र्कंडादेव येथे ऋषीपंचमीला महिला भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. भाविकांसाठी विविध सोयी पुरविण्यात येत असल्याची माहिती मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे यांनी दिली.
ऋषीपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमसाठी मंगेश गायकवाड, अरूण गायकवाड, रूपेश गायकवाड, राजेश पांडे, रामू गायकवाड आदी महाराज सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Marrakkal women devotees of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.