लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:13+5:302021-05-21T04:39:13+5:30

आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० ...

Marriage by breaking lockdown rules, bridegroom fined Rs 50,000 | लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ५० हजारांचा दंड

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ५० हजारांचा दंड

Next

आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा अधिक लोक आढळून आले.

संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार संजय राठोड, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे, तलाठी पी.जी. गजभिये, तहसील कार्यालयाचे महसूल सहायक संदीप तुपट, प्रशांत भैसारे, नगर परिषदेचे कर्मचारी राजू कांबळे, मोहन कांबळे, सुधीर सेलोकर, मंगेश चिचघरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

===Photopath===

200521\img-20210520-wa0030.jpg

===Caption===

आरमोरी येथे विवाह प्रसंगी उपस्थित लोक व कार्यवाही करताना तहसील व नगरपरिषद कार्यालयचे अधिकारी व कर्मचारी

Web Title: Marriage by breaking lockdown rules, bridegroom fined Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.