हुतात्मे कायमस्वरुपी चिरस्थायी ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:42 AM2021-09-12T04:42:00+5:302021-09-12T04:42:00+5:30

आलापल्ली येथे वन हुतात्मा दिन साजरा करण्यात आला तसेच वन हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. ...

Martyrs become permanent | हुतात्मे कायमस्वरुपी चिरस्थायी ठरतात

हुतात्मे कायमस्वरुपी चिरस्थायी ठरतात

Next

आलापल्ली येथे वन हुतात्मा दिन साजरा करण्यात आला तसेच वन हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अपर प्रधान वनसंरक्षक एम.श्रीनिवास राव होते. प्रमुख अतिथी म्हणून वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंच शंकर मेश्राम, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी.आर.तांबे, सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार, भामरागडचे आशिष पांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय वन हुतात्मा स्मारकाचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वन हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याचवेळी खासदार अशोक नेते, एम.श्रीनिवास राव, डॉ.किशोर मानकर,अजय कंकडालवार, हरीश दहागावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर आनकरी, संचालन पूर्वा दोंतूलवार तर आभार वन उपविभागीय अधिकारी नितेश देवगडे यांनी मानले. यावेळी वनाधिकारी, कर्मचारी, वनप्रेमी, वनसेवेत कार्यरत असतांना जीव गमावलेल्या परिवारातील सदस्य व नागरिक उपस्थित होते.

110921\1632-img-20210911-wa0002.jpg

आलापल्लीत वनहुतात्मा दिन साजरा,

स्मारकाचेही थाटात उदघाटन

Web Title: Martyrs become permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.