हनुवटीवरूनही मास्क झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:37+5:30
प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे. बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण कमी हाेताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे.
बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर मास्कचा विसरच पडला आहे. पूर्वीप्रमाणेच कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे.
पूर्वी शाासकीय कार्यालयात मास्कशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसे बाेर्ड लावण्यात आले हाेते. आता मात्र शासकीय कार्यालयांनाही मास्कचा विसर पडला आहे. कर्मचारीही मास्क घालत नाहीत.
धाेका अजूनही संपला नाही
काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान आहे. तसेच राज्यातील काही शहरांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वच क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० व २० च्या दरम्यान रूग्ण संख्या कायम
- मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रूग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान राहत आहे. अजूनपर्यंत एकही दिवस जिल्ह्यातील काेराेना रूग्णांची संख्या शुन्य झाली नाही. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काेराेना तपासणी केली जात आहे.
नगर परिषदेकडून कारवाई थंडावली
मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र पथक नेमले हाेते. हे पथक कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकही गायब झाले आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे.
गणेशाेत्सवाप्रमाणेच काळजी घ्या
- गणेशाेत्सवाच्या कालावधीत जिल्हावासीयांनी याेग्य ती काळजी घेतली. खासगी व सार्वजिक गणपतीच्या कार्यक्रमांचे स्वरूप मर्यादित ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढली नाही. हीच खबरदारी दुर्गाेत्सव, दसरा, दिवाळी या सणांमध्ये घेण्याची गरज आहे.