महिला पाेलिसांनी तयार केलेले मास्क नागरिकांना केले वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:29+5:302021-06-02T04:27:29+5:30
काेराेना संकटकाळात गरीब व गरजू नागरिकांची मदत करता यावी, तसेच काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पुढाकार घेता यावा यासाठी ‘माझी पेरमिली, ...
काेराेना संकटकाळात गरीब व गरजू नागरिकांची मदत करता यावी, तसेच काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पुढाकार घेता यावा यासाठी ‘माझी पेरमिली, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून परिसरातील लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करून ४५ वर्षांवरील नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवाहन केले. लोकांमध्ये लसीकरणाबाबत निर्माण झालेली अनाठायी भीती दूर करून आरोग्य केंद्र पेरमिलीकडून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत भाग घेण्यास प्रवृत्त केले. उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे, पीएसआय धवल देशमुख, पीएसआय गंगाधर जाधव, पीएसआय धनंजय पाटील व पोलीस ठाण्याचे अंमलदार तसेच नागरिक उपस्थित होते.
बाॅक्स
अन्नधान्याचीही केली मदत
लाॅकडाऊनच्या कालावधीत अनेकांचा राेजगार हिरावल्याने त्यांच्यासमाेर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अशा स्थितीत गरीब व गरजू नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये. म्हणून उपपोलीस स्टेशनकडून गरजू ८० कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाेबतच पाेलिसांनी कोरोना काळात राबविलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून प्रशंसा केली जात आहे.
===Photopath===
010621\01gad_2_01062021_30.jpg
===Caption===
नागरिकांना मास्क वाटप करताना पेरमिलीचे पाेलीस कर्मचारी.