उपपोलीस स्टेशनकडून अंगणवाडीला साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:10+5:302021-03-01T04:43:10+5:30
गुडीगुडम : अहेरी तालुक्यातील उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला यांच्याकडून हद्दीत येणाऱ्या राजारामच्या अंगणवाडी केंद्राला साहित्य भेट देण्यात आले. तालुक्यातील ...
गुडीगुडम : अहेरी तालुक्यातील उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला यांच्याकडून हद्दीत येणाऱ्या राजारामच्या अंगणवाडी केंद्राला साहित्य भेट देण्यात आले.
तालुक्यातील हद्दीत येणाऱ्या राजारामच्या अंगणवाडी क्रमांक १ च्या अंगणवाडी सेविका सावित्रीबाई रंजना माेतकुरवार यांनी पोलीस ठाण्यात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प असताना अंगणवाडी क्रमांक एकमध्ये एकूण पन्नास विद्यार्थी असून त्यामध्ये काही साधनसामग्री कमी असल्याचे राजाराम पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. लगेच ठाण्याचे पोलीस प्रभारी उपनिरीक्षक राजेंद्र भोरे व इतर सर्वांनी मिळून अंगणवाडीसाठी फॅन, मुलांना बसण्याची व्यवस्था म्हणून चटई, वॉल घड्याळ, सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा देऊन माणुसकीचे दर्शन घडवून आणले. त्यामुळे या भागातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक केले जात आहे.