गडचिरोली जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 08:20 AM2021-05-21T08:20:58+5:302021-05-21T08:21:24+5:30

Gadchiroli news डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने गुरुवारी अचानक आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

MBBS student commits suicide in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने गुरुवारी अचानक आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 
स्नेहा भिवाजी हिचामी (वय २१, रा. घोट) असे मृत युवतीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २ च्या दरम्यान स्नेहाने आपल्या घराला लागून असलेला रिकाम्या खोलीत पंखा लटकवायच्या हुकला नायलॉनची दोरी बांधून त्याला गळफास घेतला. ८ दिवसाआधीच या घरातून किरायेदार गेल्याने ते रिकामे होते. 
स्नेहा ही चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील पोलीस विभागात कर्मचारी असून घरात आई व एक भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. एका होतकरू मुलीच्या जीवनाचा असा शेवट होण्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

स्नेहाला कशाचे ‘डिप्रेशन’?
आत्महत्येपूर्वी स्नेहाने खोलीतील भिंतीवर ‘डिप्रेशन’ असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. यावरून तिला नैराश्य आले होते, पण हे नैराश्य नेमके कशामुळे हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोरोनाची स्थिती, सततचे लॉकडाऊन, त्यामुळे अभ्यासक्रमाचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने तिला हे नैराश्य आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: MBBS student commits suicide in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू