रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

By दिलीप दहेलकर | Published: July 24, 2023 04:06 PM2023-07-24T16:06:49+5:302023-07-24T16:07:35+5:30

कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १

mbulance was not available, body of young man suffering from tuberculosis was tied to bed on bike | रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

googlenewsNext

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय मृत्यूनंतरही हालअपेष्टा साेसाव्या लागत असून गडचिराेलीच्या दुर्गम भागात आराेग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत. दरम्यान रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबिय व नातेवाईकांना क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून
न्यावा लागला. 

कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १७ जुलै रोजी गणेश लामी गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. २० जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशात क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे. वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येताे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीपणामुळे कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश लामी याला जीव गमवावा लागला. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचे प्रेत दुचाकीवरून नेण्यात आले.

कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस  

सदर प्रकार लक्षात येताच खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत प्रेत गावात पोहोचले होते. याप्रकरणी भामरागडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी तो कृष्णारचा रहिवासी असला तरी त्याच्यावर पेरमीली येथे उपचार सुरू होते असे सांगितले. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. पण जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग झोपेत होते काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: mbulance was not available, body of young man suffering from tuberculosis was tied to bed on bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.