रूग्णांच्या नातेवाईकांसाठी केली जेवणाची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:34+5:302021-04-26T04:33:34+5:30
गडचिराेली : जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी युवक काॅंग्रेसतर्फे माेफत भाेजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारपासून या ...
गडचिराेली : जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी युवक काॅंग्रेसतर्फे माेफत भाेजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शेकडाे नातेवाईकांना याचा लाभ झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात चंद्रपूर, भंडारा व गडचिराेली जिल्ह्यांच्या विविध भागातील काेराेना रूग्णांना भरती करण्यात आले आहे. रूग्णांना रूग्णालय प्रशासनामार्फत जेवण पुरवले जाते. मात्र, नातेवाईकांच्या जेवणाची अडचण निर्माण हाेते. काेराेनामुळे हाॅटेलही बंद आहेत. अशास्थितीत जेवण कुठे करावे, असा प्रश्न नातेवाईकांसमाेर निर्माण हाेत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन जिल्हा युवक काॅंग्रेसने रविवारपासून नातेवाईकांना भाेजन देण्याच्या उपक्रमाला सुरूवात केली. यावेळी जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत माेटघरे, डाॅ. नितीन काेडवते, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, घनश्याम वाढई, गाैरव येनप्रेडिवार, ताैफिक शेख, आदी उपस्थित हाेते.
===Photopath===
250421\25gad_2_25042021_30.jpg
===Caption===
नातेवाईकांना जेवणाचे पाॅकेट देताना युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी.