३० व्यसनी रुग्णांवर औषधाेपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:32 AM2021-04-03T04:32:53+5:302021-04-03T04:32:53+5:30
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार ...
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे शिबिरांचे आयोजन केल्या जाते. देसाईगंज शहरातील कन्नमवार वाॅर्डातील तालुका कार्यालयात बुधवार ३१ मार्च रोजी २१ रुग्णांनी उपचार घेतला. गुरुवारी एटापल्ली तालुका क्लिनिकमधून ९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. अशा एकूण ३० रुग्णांनी पुढाकार घेत उपचार घेऊन दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला.
बाॅक्स
कन्नेपल्लीत १५ जणांवर उपचार
अहेरी तालुक्यातील कन्नेपल्ली येथे मुक्तिपथ अभियानाद्वारे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १५ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला. शिबिरात समुपदेशक साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना दारूचे दुष्परिणाम, नियमित औषोधोपचार, धोक्याचे घटक सांगत रुग्णांचे समुपदेशन केले. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी पेसा अध्यक्ष सूरज कोडापे, पेसा उपाध्यक्ष जगदीश कोडापे, खमनचेरूचे सरपंच सायलू मडावी, ग्रा.पं. सदस्य नितीन कोडापे, नागेश मडावी यांनी सहकार्य केले.