भामरागड रुग्णालयातील औषधसाठा जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे लागली आग

By दिगांबर जवादे | Published: December 14, 2023 01:03 PM2023-12-14T13:03:19+5:302023-12-14T13:03:40+5:30

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक अग्निशमन दलाने आग विझविली.

Medicine stock in Bhamragarh hospital got burnt, fire started due to short circuit | भामरागड रुग्णालयातील औषधसाठा जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे लागली आग

भामरागड रुग्णालयातील औषधसाठा जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे लागली आग

गडचिरेाली : भामरागडग्रामीण रुग्णालयाच्या स्टॉकरूमला बुधवारी सायंकाळी शाॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत औषधसाठा, दस्तावेज, रुग्णांसाठी वापरण्यात येणारे बेडशीट, ब्लॅंकेट व इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक अग्निशमन दलाने आग विझविली.

ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूलाच असलेल्या दोन खोल्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढा औषधसाठा ठेवला होता. सोबतच रुग्णांसाठी वापरण्यात येणारे बेडशीट, ब्लॅंकेटही ठेवले होते. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे या इमारतीला आग लागली. धूर बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित इमारतीकडे धाव घेतली. घटनेची माहिती नगर पंचयातीच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन वाहन येईपर्यंत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमनबंबचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. 

नागरिकांनी बकेटने पाणी टाकले. मात्र आग ओटोक्यात येत नव्हती. इमारतीमधील संपूर्ण औषधसाठा व इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशनदलाचे वाहन जवळपास एक तास उशिरा पोहोचले. वाहन पोहोचल्यानंतर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या ठिकाणी आग लागली. त्याला लागूनच ग्रामीण रुग्णालयाची इमारत व नागरिकांची घरे आहेत. मात्र आग इमारतीच्या बाहेर पसरली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Medicine stock in Bhamragarh hospital got burnt, fire started due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.